12:35pm | Jul 02, 2020 |
मॉस्को: संविधात केलेल्या बदलांना रशियातील नागरिकांनी मान्यता दिल्यामुळे रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुतीन राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे 2036 पर्यंत रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी कायम राहणार आहेत. दरम्यान, आठवडाभर सुरू असलेली जनमत चाचणी प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली. त्यामुळे पुढील 16 वर्षे राष्ट्राध्यक्षपदावर कायम राहण्याचा पुतीन यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
जाणकारांच्या मते ही घटना दुरुस्ती संमत करण्यासाठी आणि लोकांची मने जिंकण्यासाठी पुतीन यांनी पूर्ण ताकद लावली होती. आम्ही ज्या देशासाठी काम करत आहोत आणि पुढच्या पीढीला जे सोपवायचं आहे त्यासाठी आपण मतदान करत आहोत, असं पुतीन म्हणाले होते. पुतीन यांनी जानेवारी महिन्यात घटना दुरूस्तीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर पुतीन यांच्या सांगण्यावरून पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांनी राजीनामाही दिला होता. यानंतर पुतीन यांनी कमी राजकीय अनुभव असलेल्या मिखाईल मिशुस्टिन यांना पंतप्रधान केलं. 2008 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते अलेक्सेई नवालनी यांनी मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आणून पुतीन यांना आव्हान दिलं होतं. त्यानंतर निवडणूक आयोगाने नवलनीला एका प्रकरणात दोषी ठरवत त्यांची उमेदवारी रोखली होती.
जनमत चाचणीदरम्यान तब्बल 77 टक्के लोकांनी घटना दुरुस्तीच्या बाजूनं मतदान केलं. घटना दुरुस्तीच्या माध्यमातून त्यांची सध्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर त्यांना प्रत्येकी सहा वर्षाच्या दोन अतिरिक्त कार्यकासाठी अध्यक्षपदाचा कार्यकाळ मिळणार आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे होणारी गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने रशियामधील मतदानाची प्रक्रिया प्रथमच आठवडाभर चालली. घटनेतील दुरुस्तीसाठी जनतेला विश्वासात घेण्यासाठी पुतीन यांनी एक प्रचंड मोहीम हातीदेखील घेतली होती.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |