फलटण : चोरी केलेल्या मोटारी विक्री करून त्यातून आलेल्या पैशाच्या वाटणीवरून एकाचा सुर्याने खून करून, त्याच्या पत्नीला गंभीर जखमी केल्याप्रकरणी तीनजणांविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फलटण शहरातील सोमवार पेठेत एका पत्र्याच्या शेडमध्ये राचुर्या एकनाथ काळे (वय 29), पत्नी रोशनी राचुर्या काळे (दोघेही रा. बरड, ता फलटण), पप्या उर्फ शूरवीर पवार, त्याच्या सोबतची अनोळखी एक महिला आणि पुरुष सकाळी 11.30 च्या सुमारास एकत्र जेवण करत होते. जेवण झाल्यावर चोरी केलेल्या मोटारींच्या पैशाच्या वाटणीवरून त्यांच्यात वाद सुरू झाला. पप्या हा त्याला हिस्सा व्यवस्थित दिला नाही म्हणून भांडू लागला. यामध्ये त्यांच्यातील वादावादी वाढून पप्याने कमरेस लावलेल्या लोखंडी पात्याच्या सुर्याने रोशनी हिच्या डोक्यात वार केले. त्यात रोशनी गंभीर जखमी झाल्याचे पाहून राचुर्या हा पप्याच्या अंगावर धावून गेला. यानंतर पप्याने त्याच्याजवळील सुर्याने राचुर्याच्या छातीवर आणि डोक्यावर वार करून राचुर्याचा खून केला. यानंतर पप्या आणि त्याचे साथीदार पळून गेले. जखमी रोशनी हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, दहिवडीचे निलेश देशमुख यांनी भेट दिली. अधिक तपास फलटण शहर पोलीस ठाण्याचे सपोनि गायकवाड करीत आहेत.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |

गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |