01:39pm | Aug 24, 2020 |
नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. करोना व्हायरस लॉकडाउनमुळे देशात मजुरांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालं, त्यानंतर 11 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाँच केलेल्या एका सरकारी जॉब पोर्टलवर केवळ 40 दिवसांमध्येच तब्बल 69 लाखांहून अधिक जणांनी नोकरीसाठी नोंदणी केल्याचं समोर आलं आहे. पण यांच्यापैकी नोकरी मिळालेल्यांची संख्या खूप कमी आहे.
14 ऑगस्ट ते 21 ऑगस्टदरम्यान केवळ एका आठवड्यात 7 लाखांहून जास्त लोकांनी सरकारी जॉब पोर्टलवर नोकरीसाठी नोंदणी केली. पण या आठवड्यात नोकरी मिळालेल्यांची संख्या फक्त 691 आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाद्वारे आपल्या SEEM² (atmanirbhar Skilled Employee Employer Mapping) या पोर्टलवर अपलोड केलेल्या आकडेवारीनुसार नोकरीच्या शोधात असलेल्या 3.7 लाख उमेदवारांपैकी केवळ 2 टक्के जणांना नोकरी मिळाली. पोर्टलवर नोंदणी करणार्या 69 लाख स्थलांतरीत मजुरांपैकी 1.49 लाख जणांना नोकरी ऑफर करण्यात आली होती, पण केवळ 7,700 जणांनी नोकरी स्वीकारुन कामाला सुरूवात केली.
निरनिराळ्या कौशल्यांमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या लोकांना मदत करण्यासाठी असलेल्या या पोर्टलमध्ये केवळ स्थलांतरीत कामगारच नव्हे तर इलेक्ट्रीशियन, टेलर, फील्ड-टेक्नीशियन, शिलाई मशिन ऑपरेटर यांनीही मोठ्या संख्येत नोंदणी केली होती, अशी माहिती मंत्रालयाच्या सुत्रांनी दिली. याशिवाय कुरियर डिलीव्हरी, नर्स, अकउंट एक्सिक्यूटिव्ह, मॅन्युअल क्लीनर आणि सेल्स असोसिएट्सची मागणी अधिक असल्याचं त्यांनी सांगितलं.
या डेटानुसार, नोकरीसाठी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरयाणा तामिळनाडू आणि दिल्ली या मोठ्या राज्यांमधून जवळपास 42.3 टक्के जणांनी नोंदणी केली आहे. तर, पोर्टलवर सर्वाधिक 77 टक्के जॉब कर्नाटक, दिल्ली , हरयाणा, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांसाठी पोस्ट करण्यात आले आहेत. कर्नाटक, दिल्ली, हरयाणा, तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये मजुरांची संख्या कमी असून तिथे मजुरांची आवश्यकता असल्याचंही या डेटावरुन समोर आलं आहे. मार्चमध्ये लॉकडाउनला सुरूवात झाल्यानंतर या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात मजुरांचं स्थलांतर झालं होतं, यातील बहुतांश मजुर उत्तर प्रदेश आणि बिहारमधील होते. एकूणच येत्या काळात बेरोजगारी सरकारसमोर आव्हान ठरण्याची शक्यता आहे.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |