04:06pm | Sep 21, 2020 |
सातारा: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून गावडी बनावटीचे पिस्टल विक्री करणार्या संशयितास जेरबंद केले. शुभम प्रकाश ढवळे (वय25 वर्षे) रा. आतिष मंगलकार्यालयाच्या पाठीमागे दत्त हौसिंग सोसायटी, आगाशिवनगर, मलकापूर, कराड असे संशयितांचे नाव आहे. संशयिताकडून दोन गावठी बनावटीचे पिस्टल, चार मॅगझीन, तीस जिवंत काडतूस व एक मोबाईल फोन असा एकूण 1,37,000/- रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना त्यांचे गोपनियबातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ढेबेवाडी फाटा कराड येथे एक इसम गावठी बनावटीचे पिस्टल विक्रीकरण्याकरीता येणार आहे. त्यानुसार त्यांनी तात्काळ कराड परिसरात पेट्रोलिंग करीता असलेले स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास बातमी ठिकाणी जावून कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या. पोलीस पथकाने तात्काळ ढेबेवाडी फाटा येथे जावून सापळा रचला असता एक इसम संशयीत रित्या फिरताना अढळून आला त्याचा वाजवी संशय आल्यानेत्यास स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने हटकले असता सदर इसमाने हुलकावणी देवून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता. त्यास पोलीस पथकाने शिताफीने ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्टल व त्याचे पॅन्टीचे खिशात जिवंत काडतूस तसेच त्याचे हातात असलेेपिशवीमध्ये आणखी एक गावठी बनावटीचे पिस्टल असे एकूण दोन गावठी बनावटीचे पिस्टल, चार मॅगझीन, तीस जिवंत काडतूस व एक मोबाईल फोन असा एकूण 1,37,000/- रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक प्रसन्न जहाड, स.फौ. पृथ्वीराज घोरपडे, पो.हवा. विनोद गायकवाड, पो.ना. मोहन नाचण, शरद येवले, योगेश पोळ, राजकुगार ननावरे, नितीन भोसले, पोशि मयुर देशमूख, गोहसिन मोमीन, चापोना संजय जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |