08:03pm | Sep 14, 2021 |
सातारा : ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे उद्या 15 सप्टेंबर रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात पुढे नमूद आहे की गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगितले आहे. मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत काही हालचालीच केल्या नाहीत. इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय 5 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाला आहे.
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर येथील निवडणूका शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झाल्या. जर या आघाडी सरकारने वेळीच इंपेरिकल डेटा कोर्टाला दिला असता तर आज आमच्या ओबीसी बांधवावर निवडणुकीतून हद्दपार व्हायची वेळ आली नसती. पण या शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस सरकारला ओबीसींचे आरक्षण जाणून बुजून काढून घ्यायचे होते म्हणून त्यांनी कोर्टाला इम्पेरियल डेटा दिला नाही व ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले. म्हणजेच या सरकारने मागासवर्गीय आयोग नेमून सुद्धा कुठलीही कार्यवाही केली नाही. आम्ही केवळ ओबीसी समाजासोबत आहोत, असा दिखावा फक्त राज्यातील आघाडी सरकारनी करून राज्यातील ओबीसी समाजाची शुद्ध फसवणूकच केली. 4 मार्च 2021 रोजी या 5 जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गाचे जिल्हा परिषद सदस्य यांना अपात्र ठरविन्याच्या निर्णय जेव्हा न्यायालयाने दिला. तेव्हापासून राज्याचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पार्टीचे नेते वारंवार आघाडी सरकारला सांगत होते की जर राज्यातील ओबीसी चे राजकीय आरक्षण टिकवायचे असेल तर राज्यात मागासवर्ग आयोग गठित करून त्यामाध्यमातून इम्पेरिकल डेटा संकलित करावा व न्यायालयात सादर करावा. कारण तसे निर्देश न्यायालयानी 13 डिसेंबर 2019 रोजी राज्य सरकारला दिलेले होते. परंतु सरकारनी हेतुपुरस्सर पणे या विषयाकडे दुर्लक्ष केले व जातिनिहाय जनगणना करावी व 2011 चा डेटा केंद्र सरकारणी द्यावा अशाच प्रकारचे वक्तव्य आघाडी सरकारमधील मंत्री व नेते खोट्या वल्गना करित बसले. सरते शेवटी इम्पेरिकल डेटाच आवश्यक आहे हे लक्षात आल्यानंतर सुद्धा इम्पेरिकल डेटा गोळा करण्याबाबत मागासवर्ग आयोगाला अधिकार दिले नाही. आणि कोणतीही एजेंसी सुद्धा याबाबत नियुक्त केली नाही. फक्त आणि फक्त ओबीसी समाजाला खोट्या आशेवर ठेवून व ओबीसी समाजाची दिशाभूल करून पद्धतशीरपणे ओबीसी समाजाला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतून बाजूला केले. म्हणून ह्या सरकारचा ओबीसी समाजाच्या वतीने व भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध. यापुढे ओबीसी समाजाने शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस सरकारला निवडणुकीतून हद्दपार करण्यासाठी एकजुटीने लढण्याची व ह्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे.
सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यावयाच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात वकिलच उभा केला नाही असे सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणतो आहे. विधी व न्याय खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी व आघाडी सरकारचे पालक म्हणविणाऱ्या शरद पवार यांनी नाना पटोले यांच्या आरोपावर खुलासा करावा.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी काहीच हालचाल केली नाही. ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे उद्या दि. 15 सप्टेंबर रोजी तालुकापातळीपर्यंत आंदोलन केले जाईल, असा इशारा पत्रकात शेवटी देण्यात आला आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |