फलटण: मेडिकलमध्ये गोळ्या आणण्याकरिता पायी जात असताना पाठीमागच्या बाजूने एका भरधाव मोटारसायकलने धडक दिल्याने दोन जण गंभीर जखमी झाले. पुणे येथील ससूण रूग्णालयात उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. नरेंद्र सतीश जाधव (रा.जाधववाडी, ता. फलटण) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे तर सुरज धनाजी भोईटे (रा.राजाळे, ता.फलटण) याच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुकुंद हनुमंत जाधव (वय 41, रा.जि.प.प्राथ.शाळा जाधववाडी जवळ ता.फलटण, जि.सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सचिन आडके (पूर्ण नाव माहीत नाही) (रा.मठाचीवाडी ता.फलटण, जि.सातारा) यांच्यावर फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.16 मार्च रोजी सायं.7.15 च्या सुमारास जाधववाडी ता.फलटण गावचे हद्दीत निरगुडी ते फलटण जाणार्या रोडवर साई मंदिराच्या समोरील रोडवर नरेंद्र सतीश जाधव व निलेश मोहन जाधव हे साई मंदिराचे पुढील मेडिकलमध्ये गोळ्या आणण्याकरिता पायी जात होते. यावेळी सचिन आडके हा मोटारसायकलवरून भरधाव वेगात निरगुडीकडून फलटणकडे निघाला होता. त्यावेळी त्या भरधाव दुचाकीने पाठीमागून नरेंद्र सतीश जाधव यास जोरदार धडक दिली. अपघातात नरेंद्र जाधव व मोटरसायकलवर पाठीमागे बसलेला सुरज तानाजी भोईटे (रा.राजाळे) हे दोन जण गंभीर जखमी झाले. यावेळी जखमींना उपचारास रूग्णालयात दाखल करण्याएवेजी दुचाकीचालक घटनास्थळावरून पसार झाला. पुढील तपास पोलीस नाईक महेश बोडरे हे करीत आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |