02:45pm | Jul 04, 2020 |
सातारा : मराठा साम्राज्याची राजधानी असलेली सातारची भुमी ऐतिहासिक भुमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला चांगली दिशा देण्याचे काम सातारच्या बुध्दीमत्तेने केले असून, शूरवीर, आजी-माजी सैनिकांचा आणि क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून सातारची जगात ओळख असली तरी सातारी कंदी पेढयांमुळेही सातारा जिल्हयाची जगात वेगळी ओळख आहे. ही ओळख अधिकाधिक ठळक करण्यासाठीच सातारा जिल्हयातील कंदी पेढे व्यावसायिकांची संस्था स्थापन करुन, कंदी पेढयांचे जीआय मार्क मिळवण्यासाठी लागेल ते सहकार्य राहीले असे उद्गार सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काढले.
जलमंदिर पॅलेस,सातारा येथे सातारा व आसपासच्या प्रसिध्द कंदी पेढे व्यावसायीकांची सोशल डिस्टसिंग पाळुन, विशेष बैठक झाली, त्यावेळी मार्गदर्शन करताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले की, महाराष्ट्रात कंदी पेढे सर्वत्र मिळत असले तरी, सातारच्या कंदी पेढयांची वेगळी चव आणि ओळख आज सातासमुद्रापलीकडे पोहोचली आहे. सातारी कंदी पेढे तयार करण्याची परंपरागत पध्दत अत्यंत चांगली आणि हायजेनिक आहे. सध्या अत्याधुनिक यंत्र सामुग्रीमुळे परंपरागत पध्दत अगदी काही मोजक्या ठिकाणीच पहायला मिळते, तथापि इतर कंदी पेढे आणि सातारचे कंदी पेढे यांची पध्दत आणि धाटणी थोडी वेगळी आहे.
जगाच्या पाठीवर सातारी कंदी पेढयांची ओळख अधिक ठळक करण्यासाठी कंदी पेढे उत्पादकांचे एकीकरण करुन, सामुहिक रित्या कंदी पेढयांना जीऑग्राफिकल आयडेन्टीफिकेशन मिळवण्यात येणार आहे. सातारी कंदी पेढयांची जगामध्ये ओळख आहे पण त्याला कायदेशीर मानांकन मिळवला गेला पाहीजे. त्यासाठीच पेढे उत्पादकांची संस्था नोंदणी करुन, विशेष प्रयत्न केले जातील असे याप्रसंगी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगीतले.
याकामी संग्राम बर्गे यांनी पुढाकार घेतला असून, या बैठकीस उपस्थित पेढे व्यावसायीकांचे स्वागत केले. यावेळी माजी शिक्षण मंडळाचे सभापती वसंतशेठ जोशी, योगेश मोदी, अर्जुन मोदी, कन्हैयालाल राजपुरोहित, प्रशांत मोदी महेश निकम, विशाल मोदी, ओंकार जगदाळे, श्रीधर पारुदेकर, सुजित जाधव, यांसह बहुसंख्य कंदी पेढे व्यावसायिक उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |