वाई : वाई येथील पसरणी घाटात भर दुपारी टाटा टिगर कारचा थरार पाहायला मिळाला. पॉवेल येथील रहिवासी असलेले ओंकार बसवत व सुजीता बसवत है बहीण-भाऊ टाटा टिगर कारमधून महाबळेश्वरला फिरण्यासाठी जात होते. आज गुरुवारी दि. 14 रोजी दुपारी पसरणी घाटात धावत्या कारने अचानक पेट घेतला. दरम्यान, याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ पाचगणी नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाला पाचारण केले. त्यांनतर त्यांच्या मदतीने आग विझवण्यात आली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पॉवेल येथील रहिवासी असलेले ओंकार कृष्णा बसवत (वय 40) आणि त्यांची बहिण सुजीता कृष्णा बसवत हे आज गुरुवारी त्यांच्या टाटा टिगर कारमधून (एमएच 01- डीपी 1851) महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी निघाले होते. दरम्यान, पसरणी घाट चढताना दुपारी सुमारे 2.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कारच्या बोनेटमधून अचानक धूर येऊ लागल्याचे कारचालक ओंकार बसवत यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ कार घाटरस्त्याच्या कडेला ऊभी करून कारचे बोनेट उघडले असता, कारने अचानक पेट घेतला. बघता बघता आगीने उग्ररुप धारण केले. आणि क्षणार्धात कार जळून खाक झाली.
या घटनेची माहिती वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे व पाचगणी पोलीस ठाण्याचे पिएसआय यशवंत महामुलकर आणि सहाय्यक फौजदार अरविंद माने यांना समजताच त्यांनी वाई आणि पाचगणी नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाला पाचारण केले. त्यानंतर पाचगणी नगरपालिकेच्या अग्निशामक पथकाने घटनास्थळी धाव घेत कारला लागलेली आग विझवली. दरम्यान, पसरणी घाटात वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |