11:03am | Sep 26, 2021 |
सातारा : ज्या ठिकाणी सर्वाधिक गरज आहे. अशा वडूज येथील जम्बो पोर्टेबल कोविड केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात अक्षरशः सोशल डिस्टनचा फज्जा उडाल्याचे विदारक चित्र पाहण्यास मिळाले.मात्र,वडूज पोलीस ठाणे, नुतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला सर्वांनी शिस्तीचे पालन केल्याचे दिसून आले.
वडूज ग्रामीण भागात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कोविड रुग्णांची वाढती संख्या व त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात झालेली गैरसोय यामुळे वडूज ग्रामीण रुग्णालय हे टिकेचे केंद्र बनले होते. अजूनही कोविड रुग्णांना नाश्ता मिळत नाही. असे असताना ही अमेरिकन इंडिया फाऊंडेशन व राज्य सरकारने तसेच सातारा जिल्हा नियोजन मंडळ यांच्या सहकार्याने वडूज येथे नुतन कोविड केंद्राची उभारणी केली आहे. शंभर बेड च्या आधुनिक तंत्रज्ञान युक्त या बेडची पाच वेळा वरिष्ठ अधिकारी, राजकीय नेत्यांनी पाहणी करून सर्व ठिकठाक असल्याची खात्री केली होती. परंतु, प्रत्यक्षात उद्घाटना वेळीच सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची गर्दी व निवेदन देण्यासाठी आलेल्यांची झुंबड उडाली होती. एवढंच नव्हे तर दस्तुरखुद्द विधानपरिषद सभापती, पालकमंत्री व अनेक मान्यवर उशिरा उपस्थित राहिले होते. मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असली तरी गर्दी काबूत ठेवण्यास अपयश आल्याने जत्रेचे स्वरूप आले होते. पोलिसांनी गेली दोन दिवस बंदोबस्ताचे नियोजन केले असले तरी स्थानिक पातळीवर आरोग्य विभागाला कार्यक्रमाचे नियोजन करता आले नाही, काही पत्रकारांना साधी बसण्यासाठी खुर्ची मिळाली नाही.
त्यामानाने पोलीस ठाण्याचे उद्घाटन कार्यक्रमाला पत्रकार वगळता नेटनेटके नियोजन केले होते. त्यात काही त्रुटी असल्या तरी सॊशल डिस्टनचा अंतर ठेवून कार्यक्रम चांगला झाला होता. प्रवेशद्वार येथूनच भाजप माढा खासदार व माण-खटावचे आमदार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पुष्पगुच्छ देऊन माघारी फिरले होते. मंचक व कार्यक्रम स्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पुढे असे ही पाहण्यास मिळाले, जुन्या पोलीस ठाण्याला ६५ वर्षं झाल्याने सहा हजार स्वे फूट जागेवर नुतन पोलीस ठाण्याची इमारत उभी केली. त्याचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, रामराजे नाईक निंबाळकर, बाळासाहेब पाटील, शंभूराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, जिल्हाधिकारी शेखर सिह पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, सी ओ विनय गौडा आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, बाळासाहेब भरणे, कामेश कांबळे, मालोजीराव देशमुख, शीतल पालेकर यांच्या सह अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी बंदोबस्त कामी सहकार्य केले आहे. निमंत्रण पत्रिकेतील निम्मे लोकप्रितिनिधी गैरहजर राहिल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला आहे. या नुतन पोलीस ठाण्याच्या इमारतीचे ऑडिट करून उपमुख्यमंत्री पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे चांगलेच कान टोचले. इमारतीकच्या पायरी पासून ते छता पर्यंत अनेक त्रुटी दाखवून दिल्या.खर्चाचा तपशील सुध्दा मांडला व पंचनामा करून कामाची खरडपट्टी काढली. आता कोणती कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या भाषणाला अनेकांनी दाद दिली.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |