02:23pm | Nov 08, 2022 |
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि मोरबी पूल दुर्घटनेवरुन भाजपावर जोरदार टीका केली. मोरबी पूल दुर्घटनेत आतापर्यंत भाजपाकडून ना कुणी माफी मागितली ना कुणी राजीनामा दिला. या दुर्घटनेत १३५ लोकांचा मृत्यू झाला होता. गुजरातमध्ये प्रसाराचासाठी आलेल्या पी. चिदंबरम यांनी गुजरात सरकार दिल्लीहून चालवलं जात असल्याचा आरोप केला.
गुजरातमध्ये एक आणि पाच डिसेंबर रोजी दोन टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे. मोरबीत ब्रिटीश कालीन केबल पूल ३० ऑक्टोबर रोजी कोसळला होता. यात १३५ जणांचा मृत्यू झाला. एका खासगी कंपनीकडून या पुलाच्या दुरूस्तीचं काम केलं गेलं होतं आणि चारच दिवसांनी ही दुर्घटना घडली होती.
"मोरबी दुर्घटनेबाबत जितकं मला माहित आहे त्यानुसार आतापर्यंत या घटनेसाठी सरकारकडून ना कुणी माफी मागितली आणि ना कुणी राजीनामा दिला आहे. हिच घटना जर परदेशात घडली असती तर तातडीनं राजीनामे घेण्यात आले असते. आगामी निवडणूक सहजपणे जिंकू असं भाजपाला वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी या घटनेसाठी जनतेला उत्तर देणं त्यांना महत्वाचं वाटत नाही. गुजरातचं सरकार मुख्यमंत्री नव्हे, तर दिल्लीतून चालवलं जात आहे", असं पी. चिदंबरम म्हणाले.
काँग्रेसला संधी देण्याचं केलं आवाहन
"ज्या राज्यांमध्ये लोक सरकारला पराभूत करतात, त्यांना जबाबदारीची जाणीव असते वाटते. मी गुजरातच्या जनतेला आवाहन करतो की हे सरकार बदला आणि काँग्रेसला संधी द्या. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या केंद्रीय तपास यंत्रणा भाजपाच्या नोकर असल्याचसारख्या वागत आहेत. या संस्थांनी अटक केलेल्यांपैकी ९५ टक्के विरोधी पक्षांचे राजकारणी आहेत", असंही पी. चिदंबरम म्हणाले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
स्वतःच्याच घरी चोरी करणारा सहा तासात अटकेत |
क्षयरोग निवारणासाठी निक्षय मित्रांची संख्या वाढवूया |
मानवाने सत्कर्म करून पुण्याईचा बॅलन्स ठेवावा |
खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट |
दोन घटनांमध्ये गळफास घेऊन दोन जणांची आत्महत्या |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
एकास दगडाने मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
वेळे येथील अपघातात दोन दुचाकीस्वार ठार |
कर्तव्यावर असताना ट्रॅफिक पोलिसाकडून होमगार्डला मारहाण |
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |