11:44pm | Oct 26, 2020 |
सातारा : सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीवर शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार १ नोव्हेंबरपूर्वी एका वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे खासगी कोचिंग क्लासेस (शिकवणी) घेण्याची परवानगी देण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी कॉचींग क्लासेस असोसिएशनच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे, की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात लॉकडाउन सुरू आहे. महाराष्ट्रातील खाजगी कोचिंग क्लासेस दि.१४ मार्च पासून बंद आहेत. शिक्षण क्षेत्राचा दर्जा व निकाल सुधारणांमध्ये कोचिंग क्लासचे मोठे योगदान आहे. असे असताना सुद्धा या व्यवसायाला सरकारने कुठल्याही प्रकारचे अनुदान, सोई-सवलती दिल्या नाहीत. विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या फि मधून क्लासेसचे भाडे, शिक्षकांचे पगार, शैक्षणिक साहित्य, जाहिराती, शासनाचे विविध कर भरावे लागतात. एवढा खर्च वजा करून शिल्लक राहिलेल्या रकमेतून घराचे हप्ते, भाडे, बँकांची कर्ज, मुलांचे शिक्षण, रेशन पाणी, औषध इत्यादी खर्च करावे लागतात. लॉकडाउनमुळे खाजगी कोचिंग क्लासेस हा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे कोचिंग क्लासेस व्यावसायिक प्रचंड अडचणीत आले आहेत. क्लासचे भाडे थकले आहे. घराचे हप्ते, भाडे, बँकांची कर्ज, शिक्षकांचे पगार, मुलांच्या शाळेची फी थकली आहे. आधीच सेमी मराठी शाळेतील कमी झालेली विद्यार्थी संख्या, इंग्रजी शाळांमधील विद्यार्थ्यांची क्लासकडे पाठ आणि कोरोना या चक्रव्युहात कोचिंग क्लास व्यवसायिक अडकले आहेत. यातून मार्ग कसा काढावा या विचाराने ते प्रचंड तणावाखाली चिंताग्रस्त आहेत. महाराष्ट्र राज्यात २० ते २५ हजारांपेक्षा अधिक कोचिंग क्लासेसची संख्या आहे. २ लाख ५० हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काम करतात. खाजगी कोचिंग क्लासेस या व्यवसायावर पाच लक्ष कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. महाराष्ट्रातील २० ते २५ लक्ष लोकांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर सुरू आहे. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या खाजगी कोचिंग क्लासेस चालकांना सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करण्याच्या अटीवर १ नोव्हेंबर पूर्वी क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी क्लासेस सुरू राहतील. एकाही संचालकांवर कारवाई झाल्यास असोसिएशनचे राज्याध्यक्ष प्रा. पांडुरंग मांडकीकर यांनी यापूर्वीच आत्मदहनाचा इशारा दिला असल्याचे निवेदनात नमूद करत कोचिंग क्लासेस जागा मालकांनी भाडे माफ करण्यासंबंधी शासनाने त्वरित अध्यादेश काढावा, क्लासेसचे एक वर्षाचे जीएसटी, व्यवसाय कर, आयकर, लाईट बिल, व स्थानिक कर माफ करावेत, कोचिंग क्लासेस व्यावसायिकांना दि.१ एप्रिल २०२० पासून क्लासेस सुरू होईपर्यंत ४० हजार रुपये तर शिक्षकांना २० हजार रुपये मानधन देण्यात यावे. क्लासेस क्षेत्राचा सूक्ष्म, की लघु व मध्यम उद्योग अंतर्गत समावेश करावा, कोचिंग क्लासेस व्यावसायिकांना मुद्रा लोन देण्यात यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |