10:42pm | Jul 05, 2020 |
सातारा : सातारा शहरात सुरू असलेले ग्रेड सेपरेटरचे काम अत्यंत उत्कृष्टपणे झाले असून सातारकरांना २०१६ साली दिलेला शब्द पूर्णत्वास जात आहे, याबाबत आपणाला अभिमान वाटत असल्याचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आज ग्रेड सेपरेटरच्या कामाची पाहणी केली. त्याप्रसंगी ते बोलत होते. उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, माजी उपनगराध्यक्ष राजू भोसले, पाणीपुरवठा विभागाचे माजी सभापती श्रीकांत आंबेकर, बांधकाम विभागाचे माजी सभापती मनोज मनोज शेंडे, सुजाता राजेमहाडिक, सुनील काटकर, राम हादगे आदी मान्यवर उपस्थित होते.
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणाले, २०१६ साली सातारा विकास आघाडीने जाहीर केलेल्या वचननाम्यात सातारकर जनतेला काही शब्द दिले होते. त्यामध्ये उड्डाणपुलाचा समावेश आता. उड्डाणपूल नियोजित होता मात्र ग्रेड सेपरेटरचे काम हाती घेण्यात आले. पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा नूतन पुतळा उभारण्यात येणार असून हा पुतळा अत्यंत दिव्य भव्य असा असेल. सातारा विकास आघाडीने दिलेल्या शब्दानुसार ग्रेड सेपरेटर, भुयारी गटार योजना, कास धरणाची उंची वाढवणे ही कामे पूर्णत्वास जात असताना दिलेला शब्द पाळला याचा अभिमान वाटत असून आम्ही केलेल्या कामाचे श्रेय कोणीही घेऊ द्या, असा टोला त्यांनी यावेळी बोलताना विरोधकांना लगावला. साताऱ्यात अनेक वर्षापासून घोषणा झाल्या मात्र सातारा विकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर जी वचने दिली होती त्याची पूर्तता केली जात आहे. अनेक विकास कामांना मूर्त स्वरूप दिले गेले. माझ्या माध्यमातून अनेक प्रकल्प झाले मात्र ग्रेट सेपरेटर हा नजर लागण्यासारखा प्रकल्प झाला याचे मला समाधान वाटते. मोठे प्रकल्प साकारताना अनेक अडथळे येत असतात असे सांगून नोव्हेंबर २०२० अखेर हा प्रकल्प पूर्ण होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
ही कामे कोणी केली हे समजण्याइतपत सातारची जनता सुज्ञ आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रारंभी उदयनराजे भोसले यांनी ग्रेट सेपरेटरमधील लाईट व्यवस्था, गटरच्या पाण्याची व्यवस्था, आतील साऊंड सिस्टिम, काँक्रीट वर्क कसे आहे याची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
राजमाता यांनी केले होते भूमिपूजन
राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी मार्च २०१८ साली गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रेड सेपरेटरच्या कामाचे भूमिपूजन केले होते. या घटनेला आज ३ वर्ष ३ महिने पूर्ण होत असताना खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी या कामाची पाहणी करून काम उत्कृष्ट होत असल्याची पावती दिल्याने हे काम कोणाच्या माध्यमातून झाले हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही.
उदयनराजे यांनी सातारकरांचे हित जोपासले : आंबेकर
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून जाहीर केलेल्या जाहिरनाम्यातून सातारकरांना जी वचने दिली होती, ती आज पूर्णत्वास जात आहेत, याचा मनोमन आनंद वाटत आहे अशी प्रतिक्रिया पोवई नाका येथील स्थानिक नगरसेवक, पाणीपुरवठा विभागाचे माजी सभापती श्रीकांत आंबेकर यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना दिली. ग्रेड सेपरेटरच्या कामाची फित कापण्यापेक्षा उदयनराजे भोसले यांनी सातारकरांचे हित जोपासण्यास प्राधान्य दिले आहे हे सातारकर जनतेने नेहमी लक्षात ठेवण्याची गरज आहे. या कामामुळे सातारा शहरातील वाहतूक कोंडी होणार नसल्यामुळे प्रवास सुखकर होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |