अजित जगताप
सातारा: ग्रामीण भागातील जनतेच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी साठ वर्षापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समितीची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे गावपातळीवर त्याला अनन्य साधारण महत्व आले आहे. खटाव तालुक्याचा कारभार हा वडूजनगरीतील पंचायत समितीमार्फत होतो. पण अद्याप ही कोरोना महामारीच्या ‘लॉकडाऊन’ मधून काही अधिकारी-कर्मचारी बाहेर पडले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कारभाराला गती देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
खटाव पंचायत समितीच्यामार्फत वडुज येथील इमारतीतील शिक्षण, शेती, लघुपाटबंधारे, प्रधानमंत्री आवास योजना, पशुसंवर्धन, मनेरेगा तसेच महिला व बालविकास, जवाहर विहीर योजना, शेतीची अवजारे पुरवणे, शालेय पोषण आहार विभागातील व इतर कामांना तांत्रिक मंजुरी देणे. लाभार्थी निवड करणे, स्वयंरोजगार, स्वच्छता अभियान अशी विविध कामे करण्यात येतात. त्यामुळे ग्रामस्थांचा थेट संपर्क पंचायत समितीच्या कर्मचार्यांपर्यंत पोहोचतो. सद्या लॉकडाऊनच्या काळात सर्व प्रकारचे कामे ठप्प झाली होती.
या कामांना संजीवनी मिळावी या आशेने खटाव तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, मोलमजुरी करणारे मजूर व त्यांचे सहकारी शासकीय कामकाजनिमित वडूज येथील पंचायत समिती ला भेट देण्यात धन्यता मानतात. शेती विभाग, पशुसंवर्धन, आरोग्य, समाजकल्याण विभागात लोकांची कामे अस्तिवाईकपणे केली जातात.तसेच वडुज येथील बाजार पटांगणातील जि.प.बांधकाम विभागात सध्या गतीने दुरुस्ती व देखभालीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. मात्र, इतर विभागाचे कामकाज म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत. खटाव तालुक्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी ग्रामस्थांची अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न करतात. पण, गेली सहा महिने कोरोना महामारीमुळे खटाव पंचायत समितीचे बंद असलेले प्रवेशद्वार अद्याप उघडले नाही. अजूनही खटाव पंचायत समिती इमारत ‘लॉकडाउन’ मधून बाहेर पडली नाही. ती कशामुळे अडकून पडली? त्यामुळे पंचायत समिती प्रमुख प्रवेशद्वार बंद आहे, अशी विचारणा होऊ लागली आहे.
येथील भूमिपुत्र असलेल्या सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते व इतर मान्यवरांनाही वडूज येथील पंचायत समितीच्या आवारात जाण्यासाठी प्रमुख प्रवेशद्वार बंद असल्याने दुसर्या अरुंद प्रवेशद्वारातून ये जा करावी लागत आहे. या ठिकाणी दोन वाहने समोरासमोर आली की, वाहने मागे पुढे करावी लागतात. याठिकाणी अनेक ग्रामस्थ पायी व दुचाकी घेऊन भेटी देतात. काहींची साधी कामे सुध्दा होत नाहीत. सुखद बाब म्हणजे येथील ठराविक अधिकारी- कर्मचारी हे शासकीय योजना ग्रामीण भागात पोहचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात. त्यांच्या कामाचे कौतुक व कामचुकार अधिकारी व कर्मचार्यावर कारवाई व्हावी यासाठी आता सातारा जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी गंभीर दखल घ्यावी अशी मागणी होत आहे. तसेच पंचायत समितीचे मुख्य प्रवेशद्वार त्वरित उघडून ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी. कारण, सर्वसामान्य जनता तसेच गरीब लाभार्थी लोकांची कामे पंचायत समिती स्तरावर असतात, असे मत रिपाइंचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष कृणाल गडांकुश व मनसेचे तालुका उपाध्यक्ष सुरज लोहार यांनी व्यक्त करून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |