कराड : मलकापूर नगरपरिषदेने गणेशोत्सवादरम्यान कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असून या उपक्रमांतर्गत श्री गणेशमुर्ती विसर्जनासाठी नागरीकांनी गर्दी करु नये याकरीता शहरातील प्रत्येक विभागात श्री गणेशमुर्ती संकलन करुन त्याचे विधीवत पुजन करुन विसर्जन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे. याकरीता नगरपरिषदेने स्वतंत्र व्यवस्था म्हणून 2 ट्रॅक्टर ट्रॉली व 5 चारचाकी वाहनांचे प्रभागनिहाय नियोजन केलेले आहे. मलकापूर नगरपरिषद ही महाराष्ट्रातील एकमेव नगरपरिषद आहे की ज्या नगरपरिषदेने एक नगरपरिषद एक गणपती हा उपक्रम हाती घेवून तो यशस्वी केलेला आहे. यामध्ये शहरातील सर्व गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांचा मोलाचा वाटा आहे. याबरोबरच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महसूल विभाग व पोलिस प्रशासन यांनी सुध्दा महत्वाचे योगदान दिले आहे.
नगरपरिषदेने श्री गणेशमुर्ती संकलन करीता उपलब्ध केलेली वाहने मलकापूर शहरामध्ये सकाळी 9 ते सायकाळी 5 वाजपर्यंत उपलब्ध होणार असून गणेश भक्तांनी नगरपरिषदेने खाली नियुक्त केलेले संमन्वयक व नोडल अधिकारी यांना फोनव्दारे पुर्वसुचना द्यावी. जेणेकरुन संबंधीत पथकास आपले घरी येवून श्री गणेशमुर्तीचे संकलन करणे सोयीचे होईल. नागरीकांनी गणेश विसर्जन दिवशी गर्दी टाळावी याकरीता सदरचे नियोजन नगरपरिषदेने केलेले असून या उपक्रमामध्ये नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. नगरपरिषदेचे पथक प्रत्येक प्रभागात फिरुन श्री गणेशमुर्तींचे संकलन करणार आहे व संकलित मुर्तींचे विधीवत पुजन करुन विसर्जन करणार आहे. याबाबत विभाग निहाय विशेष नियंत्रण अधिकार्यांची नेमणूक केली असून राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 च्या पुर्व बाजूस रमेश बागल, आरोग्य विभाग प्रमुख मो. नं. 9765562255 व पश्चिम बाजूस रामचंद्र विलास शिंदे, व्यवसाय कर विभाग प्रमुख मो. नं. 9922797312 यांची नेमणूक केलेली आहे.
मलकापूर नगरपरिषदेचा प्रत्येक सार्वजनिक उपक्रमामध्ये लोकसहभाग असून यामुळेच नगरपरिषदेच्या सर्व नाविण्यपुर्ण योजना व उपक्रम यशस्वी झालेल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रात मलकापूर नगरपरिषदेस एक आदर्श नगरपरिषद म्हणून ओळखले जात आहे.
मारहाण करीत ट्रॅक्टरसहित एकाला पेटवून देण्याची धमकी |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हे |
आदेशाचे उल्लंघन केल्याने परदेशी नागरिकांवर गुन्हा |
महिलेचा आकस्मिक मृत्यू |
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |
मर्ढे येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेले |
खंडाळा येथून बजाज पल्सर लंपास |
युवतीचा गळफास लावून घेण्याचा प्रयत्न |