दीपक जगन्नाथ गायकवाड यांचा ‘पाणाड्या’ हा कथासंग्रह शब्दशिवार प्रकाशनने प्रकाशित केला. दीपक गायकवाड यांचा हा पहिलाच कथासंग्रह आहे. आजवर मराठी साहित्यातील कथेच्या प्रांतात अनेकांच्या लेखनी तून कसदार साहित्याची लेणी उभारली गेली. त्याच परंपरेचा वारसा आजही नवोदित युवा पिढी वैविद्यपूर्ण, अभ्यासपूर्ण, लेखन करून जोमाने सुरू ठेवताना दिसत आहे. अशा अनेक युवा कथाकारांमध्ये दीपक गायकवाड यांचा नामोल्लेख करावा लागेल. पाणाड्या हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला नाही तर अनेक वाचकांच्या पसंतीला उतरला. दीपक गायकवाड हे मूळचे मंगळवेढा सारख्या अवर्षणग्रस्त तालुक्यातील बावची गावचे. शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन जीवनापर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षमय होता आणि या संघर्षातूनच त्यांना लेखनाची वाचनाची आवड निर्माण झाली. तसे पाहता माणसाचं जगणं आणि त्याच्या वाट्याला आलेलं सुख दुखःआणि त्याने अनुभवलेलं, सोसलेले, भोगलेले यातूनच कसदार साहित्य निर्माण होतं आणि हेच दीपक गायकवाड यांनी आपल्या लेखणीतून मांडलेल आहे.
या कथासंग्रहात एकूण 12 कथांचा समावेश आहे. या कथातून लेखकाने ग्राम जीवनाचे सकस चित्रण केले असून सार्याच कथांना ग्रामीणतेचा बाज आहे. ग्रामीण जीवनातील जनजीवन, सुखदुःखे या सर्वांचे दर्शन त्यांच्या कथासंग्रहातून घडते. लेखकाचे बालपण ग्रामीण भागातच गेल्यानंतर अर्थांतच जन्मापासून ग्राम जीवनाचा प्रभाव राहिला आहे. ग्रामजीवन हाच केंद्रबिंदू असल्याने त्यांच्या कथेतून ग्राम जीवनाचे अनोखे चित्र वाचकांच्या नजरेसमोर उभे राहते. दिपक गायकवाड यांच्या कथेतून खेड्यातील खेडूत लोकांचे दुःख काळजाला हात घालते. ग्रामीण जीवनातील भाषा, जगण्याची रीत, संस्कृती, रूढी, परंपरा त्यांच्यातला कणखरपणा प्रसंगी हळवेपणा, भोळे -भाबडापणा, देवावरचा विश्वास श्रद्धा, अंधश्रद्धा स्वार्थ वा परमार्थ हर्ष खेद या सर्वांचा अनुभव वाचकांना कथेच्या माध्यमातून येतो. आजही जगाच्या पोटाची काळजी मिटवणारा ‘पोशिंदा’ मात्र उपाशी पोटीच शेतात राबतो ही व्यथा अनुभवताना वाचक हळवा होऊन जातो.
‘पाणाड्या’ पायातल्या वाहना काढून पाणाड्यानं आपलं नागडं पाय आप्पाच्या शिवारात टाकलं पण बघणार्यांनी मारक्या म्हशीगत डोळे पाणाड्या वर ताणलं. वार्याच्या झुळकीने ज्वारीची ताट हालल्यागत उगाचच पाहणार्यां कडे बघणार्या माणसाची मुंडकी हलू लागली. ही खरी जगण्याची वृत्ती शब्दांच्या हवाली केलेली असते. ती मोहक असतेच आणि वेधकही असते. शेती पिकवण्यासाठी, फुलवण्यासाठी पाणी हवेच असते पण ज्या शिवारात पाणीच नाही. असं यंत्र सांगत असतं तिथं पाणाड्यानं आपलं आवाहन स्वीकारलं 300-400 फुटावर पाण्याचा ठिपूस नाही म्हटल्यावर सगळ्यांचीच वाळलेली तोंड आणि कथानायक आप्पाची जिद्द समोरासमोर उभे राहतात. पुजन न करता दुसर्या होलातून आलेले पाण्याचे फवारे हिच आप्पाच्या जिद्दीची कमाई व्यवसायिक पाणाड्याचा पराभव करणार्या आप्पातून एक नवीन उमदा पाणाड्या जन्माला येतो तो स्वतःच्या नशिबाच्या बळावरच या कथेतून दिपक गायकवाड यांनी एका कष्टाळू श्रमनिष्ठ शेतकर्याचे चित्रण केलेले आहे. स्वतःच्या हिमतीवरती आणि बळावरती खूप प्रयत्न करतात. प्रसंगी त्यांना स्वतःच्या इच्छा अपेक्षा मारावे लागतात. अनेक भूजल शोधकावरती विश्वास ठेवून पाणी शोधण्याचे काम करतात पण अपयश आल्यानंतर स्वतः स्वतःच्या नशिबावरती विश्वास ठेवून त्या जागेचा पूजन न करता बोर मारणारा आप्पा एक स्वतः जातिवंत पाणाड्या म्हणून जन्माला येतो.
कालपर्यंत सामान्यांच्या पंगतीला बसणारा इतरांच्या दृष्टीने शुल्लक असणारा आप्पा आज मोठा पाणाड्या झाला यातून ग्रामीण जीवनातील माणसांची कष्ट करण्याची वृत्ती वाचकांना पाहावयास मिळते. सर्वांग सुंदर माझ गाव गाव माझ्या गावाला आदर्श गावचा पुरस्कार प्राप्त व्हावा माझ्या गावातील सर्व वाईट धंदे बंद व्हावेत आणि डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत घडावा अशी प्रामाणिक अपेक्षा व्यक्त करताना दिसतो. यातून लेखकाला आपल्या गावाविषयी असणारे प्रेम, असणारी आपुलकी, श्रद्धा या सर्वांचे दर्शन वाचकांना घडते.
‘धाड ’या कथेची भाषा ही विनोदी स्वरूपाची आहे. गावामध्ये वाईट प्रवृत्ती वर ती धाड पडल्यानंतर पत्याच्या डावावरून पळापळ करणार्या माणसांची परवड या कथेत विनोदी अंगाने मांडलेली आहे. आळशिपणामुळे झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेने वाम मार्गाचा अवलंब करणार्या माणसांचे चित्रण वास्तवदर्शी आले आहे. दीपक गायकवाड यांनी ग्रामीण भागातील बालविश्व तपशिलाने रेखाटले आहे. त्यांच्या अनेक कथांचे नायक हे लहान निरागस निष्पाप मुलेच आहेत. त्यात ‘सायकल’ कथा लक्षवेधी आहे. काही वर्षांपूर्वी घरांमध्ये सायकल असणं ही एक श्रीमंत पणाची गोष्ट मानली जायची ज्याच्या घरी सायकल आहे. तो प्रतिष्ठित मानला जायचा आणि हेच लहान मुलांचे आकर्षण असायचे. या कथेतील नायक त्याचा तसाच निरागस भाऊ, आई-वडील, मित्र, गुरुजी यांच्या बरोबर भावकीतली माणसं इथं कथेत दिसतात. दुसर्याच्या सुखाचा हेवा अकारण करणारी ही माणसं सायकल म्हणजे कथानायकाचा जीव की प्राण ती सायकल दगड धोंड्यांतून खड्ड्यात - खड्ड्यातून पळवणारा मित्र म्हणजे त्याला शत्रू वाटतो. जीव की प्राण असणारी सायकलनं आणि त्या सायकलीचा नायक यांच्या दोघातील प्रेम या कथेतून चित्रित झाले आहे. ‘जलस्वराज्य’ कथेतून शासनाच्या योजनांचे कसे मातेर होतं आणि शासनाचा निधी कसा हडप केला जातो. याचे चित्रण जलस्वराज्य कथेतून लेखकाने मांडले आहे.शासन जनतेसाठी जनतेच्या हितासाठी नेहमी सतर्क असते पण गावपातळीवरील राजकारणामुळे असंख्य योजना मातीमोल ठरले आहेत. याचे प्रत्ययकारी चित्रण ‘जलस्वराज्य’ कथेतून आले आहे. ‘जलस्वराज्य’ वाचताना वाचक खळखळून हसतो आणि कथेचा आस्वाद घेतो. ‘अधुरे स्वप्न’ या कथेत आईवडिलांसाठी काहीतरी करावं आणि ते करता येत नाही म्हणून चिंतीत असलेला या कथेचा नायक आई-वडिलांच्या सुखासाठी तळताना दिसतो आहे. या कथेत एक कविता सुद्धा आहे ती कविता वाचताना वाचक वेगळ्या विश्वात रमतो. त्याच बरोबर लेखकाने सुंदर सुभाषितांचा, गीतांचा उपयोग केलेला आहे त्यामुळे वाचकांची वाचण्याची रुची वाढते आहे.
बळीराजाची जीवनकहानी ‘आयडियल’ कथेतून साकारली आहे. या कथेचा नायक पिंटू उर्फ अनिल तुकाराम पवार याच्या कुटुंबीयांची करून व्यथा कथेत चित्रित झालेली आहे. कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाची होणारी परवड. डाळिंबीच्या बागेवरती आलेल्या तेल्या रोगाचे संकट याने ग्रासलेला पिंटू त्याचबरोबर कर्ज काढून दुसर्या वर्षी त्याच जोमाने डाळिंबाची बाग फुलवतो पण त्याच वर्षी म्हणावा तसा दर सापडत नाही म्हणून त्याची होणारी जीवाची उलघाल या कथेत वाचकाला अस्वस्थ केल्यावाचून राहात नाही. निसर्गाची अवकृपा तर बळीराजाच्या पाचवीलाच पुजलेली आहे. त्यात भर म्हणून बँकेचा हप्ता, सावकारी या सगळ्यांची दखल या कथेत लेखकाने घेतली आहे. ही कथा वाचताना शेतकर्याची होणारी परवड वाचकांच्या नजरेपुढे येते आणि मग वाचक हा अंतर्मुख होऊ लागतो.
भाऊ नावाचा बापमाणूस या कथेत भाऊंचे व्यक्तिचित्र अत्यंत सकसपणे लेखकाने चित्रित केलेले आहे. या कथेत भावा- भावांच्यातलं प्रेम त्याचबरोबर त्यांच्या होणार्या वाटण्या आणि वाटण्या करण्यासाठी आलेले पंच त्या पंचांचे स्वभाव त्यांचा बेरकीपणा’ धूर्तपणा या सर्वांचा अनुभव ही कथा वाचल्यामुळेच वाचकाला होतो. हे विसरून चालणार नाही. या कथेत भाऊंचा व्यक्तिचित्र हे अत्यंत वाचनीय आहे ते कथा वाचल्याशिवाय कळणार नाही.
‘चिकन गुनिया’ या कथेतून साथीच्या आजाराने होणारे जनतेचे हाल आणि त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी केलेले प्रयत्न या सर्वांचे चित्रण आले आहे. साधूसंताची भूमी असलेल्या भूमीत दिपक गायकवाड आपल्या कथेतून साधुसंतांच्या वाचनाचे महात्म्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वपूर्ण काम करतात हे ही कथा वाचल्यावर समजते. ‘वावटळ’ ही कथा स्वप्नात घडते आहे निसर्गाच्या रूपांचं येथे चित्रण लेखकाने केले आहे. बालवयात झोपेत पडलेले स्वप्न आणि त्या स्वप्नात बालवयातील मुलाने पाहिलेली वावटळ आणि त्या वरळीमध्ये मीठ टाकल्यानंतर भूत दिसते. असा एक अंधविश्वास ठेवून कथेचा बाल नायक बाजा मिठाची चिवट वावटळीत टाकतो आणि त्या वार्याच्या प्रचंड झोताबरोबर गायब होतो आणि स्वप्नात अन त्याचा भाऊ बाजा म्हणून हाका मारतो अशी ही अद्भुत कथा वाचकाची उत्सुकता ताणून धरले शिवाय राहत नाही. या कथासंग्रहातील शेवटची कथा ‘पछाडलेलं वडाचे झाड’ ही अद्भूत कथा आहे. ही कथा वाचताना वाचकाची उत्सुकता शिगेस पोचते. भुताखेतांवर अंधविश्वास ठेवणारी अंधश्रद्धा जपणारी पसरवणारी माणसं अजूनही या प्रगत युगामध्ये वावरतात आणि स्वतःच्या ज्ञानाला अंधपणाने मर्यादित ठेवतात. हे या कथेतून वाचकास मनोमन पटते या कथासंग्रहातील सर्वच कथा लक्षवेधक आहेत. पाणाड्या कथासंग्रहातील भाषा सोलापुरी आहे या कथासंग्रहात लेखकाने सुभाषितांचा गीतांचा म्हणींचा ग्रामीण शब्दांचा ग्रामसंस्कृतीचा ग्रामीणनेतेचा लोकरूढींचा लोकपरंपरेचा एकूणच काय ग्राम जीवनाचा वेध घेणारा कथासंग्रह म्हणजे पाणाड्या होय असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कथासंग्रह अत्यंत वाचनीय आहे. दीपक गायकवाड यांचा पाणाड्या हा कथासंग्रह सर्वांग सुंदर आहे. वाचकास तो निश्चितच आवडेल, असे मला वाटते कथासंग्रहाचे मुखपृष्ठ अत्यंत आशयाला अनुरूप आहे. त्याचबरोबर या पुस्तकाचे मलपृष्ठ त्याहून सुंदर आहे. त्याहीपेक्षा डॉ.राजेंद्र दास यांनी दिलेला मलपृष्ठावरील शब्दरूपी आशीर्वाद हा लेखकाच्या प्रतिभेला प्रेरणा देणार आहे. पुस्तकाला लाभलेली प्रस्तावना ही राजेंद्र दास यांचीच आहे. या प्रस्तावनेने लेखकाची आणि पुस्तकाची साहित्यिक उंची प्राप्त झाली आहे हेही तितकच खरे. दीपक गायकवाड आपण एक उत्कृष्ट साहित्यिक म्हणून आपला ठसा उमटवाल, यात शंका नसावी. आपल्याकडून अखंडपणे सकस साहित्य निर्मिती व्हावी, एवढीच ईश्वरचरणी मनोमन प्रार्थना. आपल्या सखस लेखन प्रवासास माझ्या लक्ष लक्ष शुभेच्छा! धन्यवाद!!!
- शब्दांकन
प्रा.नंदकुमार शेडगे
मोबा: 9766209214
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |