08:01pm | Mar 05, 2021 |
सातारा : केंद्र सरकारच्या सेन्ट्रल रोड फंड योजनेतुन, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्याविषयी विनंती केली असून, ना. नितिन गडकरी यांनी सेन्ट्रल रोड फंडामधुन जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न येणार्या अंदाजपत्रकात केला जाईल, असे आश्वासन दिले आहे. ना. गडकरी यांचा दिला शब्द खरा करण्याचा नेहमीच प्रयत्न असतो त्यामुळे केंद्राच्या सेन्ट्रल रोड फंड योजनेत सातारा जिल्ह्यातील अनेक कामांचा समावेश होईलआणि त्याकरीता भरीव निधी मिळेल असा विश्वास खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे व्यक्त केला आहे.
आमच्या विनंती आणि आग्रहाखातर ना.नितीन गडकरी यांनी आजपर्यंत जेव्हा-जेव्हा संधी मिळेल त्या-त्या वेळी सातारा जिल्ह्याकरीता विविध विकास कामांसाठी मंजूरी दिली आहे. निधी दिला आहे, असे नमुद करुन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, ग्रेड सेपरेटरकरीता ना.गडकरी आणि तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस यांनी मोलाचे सहकार्य केल्यामुळेच आज सातारा सारख्या विकसनशील शहरामध्ये ग्रेडसेपरेटर सारखे देखणे आणि दूरगामी चांगला परिणाम करणार्या विकास कामाचे लोकार्पण करण्यात आले आहे. यापूर्वीही ना.गडकरी यांनी सेंन्ट्रल रोड फंड मधुन सातारा जिल्ह्याकरीता सतत झुकते माप देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे यंदाच्या अंदाजपत्रकात सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त विकास कामांचा समावेश केला जाणार आहे.
जिल्ह्यातील विकासकामे - 1)राज्य महामार्ग क्र.148 मौजे डिचोली-नवजा-हेळवाक-मोरगिरी-गारवडे-साजुर-विंग-वाठार-रेठरे-शेणोली स्टेशन रोड 2) ता.जावळी,वाई-पाचवड-मेढा रोडचे एमडीआर 19- 47.000 ते 53.000 अखेर रस्त्याचे रुंदीकरण 3) राज्य महामार्ग क्र.139 पोलादपूर-महाबळेश्वर-वाई-भाडळे रस्त्याची सुधारणा करणे 4) एमडीआर-25, .पाचगणी-कुडाळ-खडकी-चांदवडी-जाब-किकली-म्हापरवाडी-लगडवाडी रस्ता सुधारणा करणे 5) कराड शहराच्या पूर्वेकडील तासवडे शहापूर ते पाचवडफाटा अखेररिंगरोड तयार करणे 6) कराड शहराच्या पश्चिमभागाकडील साकुर्डे ते पाचवड फाटा अखेर रिंगरोड तयार करणे 7) राज्यमहामार्ग क्र.146,/60 पुसेगांव-वडूज-कातरखटाव ते राज्यमहामार्गाचे रुंदीकरण आणि सुधारणा 8) ता.कोरेगांव रहिमतपूर- अंभेरी -वडूज रोड एमडीआर 38 -00.00 ते 29.000 अखेर रस्ता सुधारणा करणे.
इत्यादी कामांसह आणखीन काही कामे ना.गडकरी यांना सुचविणेत आलेली आहेत. त्यामुळे या विकास कामांपैकी शक्य तितक्या जास्त कामांना केंद्राच्या अंदाजपत्रकात तरतुद करुन, मार्गी लावण्याचा पाठपुरावा सुरु आहे. त्यामध्ये सर्वाच्या सहकार्याने यश येईलच, असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |