08:56pm | Jun 15, 2021 |
सातारा : ज्येष्ठ संपादक गिरिश कुबेर यांच्या रेनिसॉंस स्टेट हे पुस्तक सनातनी विचारांचे चोपडे जातीयवादाने भरले आहे. कुबेरांमध्ये सुसंस्कृतपणा शिल्लक असेल तर त्यांनी स्वतःहून मागे घ्यावे. महाविकास आघाडी सरकारने या पुस्तकावर बंदी घालून कुबेर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी श्रीमंत कोकाटे यांनी केली. या पुस्तकाच्या संदर्भात आपण स्वतः खासदार उदयनराजे भोसले यांना भेटणार असल्याचे इतिहास संशोधक व वक्ते डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले, या पुस्तकात छत्रपती शिवरायांसह त्यांच्या सर्व वंशजाबद्दल आक्षेपार्ह व चुकीचा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. कुबेरांचे हे पुस्तक म्हणजे पुरंदरेंचा इंग्रजी अवतार असून या पुस्तकांवर राज्यशासनाने तत्काळ बंदी घालावी व कुबेरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.
ते पुढे म्हणाले, दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवराय यांचे गुरू नव्हते हे शासन नियुक्त वसंत पुरके समितीने सिद्ध केले आहे. हा वैचारिक वाद महाराष्ट्रात सात वर्ष सुरू होता. याची गिरिश कुबेरांना अजिबात कल्पना नव्हती असे होत नाही. संशोधनाअंती राज्य सरकारने दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवून त्यांच्या नावाचा क्रीडा पुरस्कार रद्द केला. तरीसुध्दा रेनीसॉन्स स्टेट या पुस्तकात कुबेर ओढूनताणून कोंडदेवांचा जन्म शिवरायांशी जोडतात हा कुबेरांचा उद्धटपणा आणि विकृती आहे.
कुबेरांची मांडणी छत्रपती शिवराय- राजमाता जिजाऊ यांची बदनामी करणारी आहे. शिवरायांच्या कर्तृत्वाचे श्रेय हिरावून सनातनी व्यवस्थेला देणे हा कुबेरांचा उद्देश आहे. संशोधनाचे कोणतेही नियम न पाळता लेखणी उचलून खरडपट्टी करण्याची कुबेरांची पद्धत आहे. कुबेरांचे हे पुस्तक पुरंदरेंचा इंग्रजी अवतार असल्याचा आरोप कोकाटे यांनी केला. छत्रपती संभाजीराजे, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शाहू यांच्या बाबतही कुबेर यांनी आक्षेपार्ह मांडणी करून अनैतिहासिक मजकूर प्रसिद्ध केला असून कुबेरांची ही मांडणी संघी विकृतीने भरली असल्याची टीका कोकाटे यांनी केली.
जे कुबेर संत रामदास टिळक सावरकर टिळक हेडगेवार गोळवलकर यांचे विस्ताराने कौतुक करतात ते चक्रधर बसवेश्वर, संत तुकाराम महाराज महर्षी वि .रा. शिंदे ,कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव भोसले, अण्णाभाऊ साठे यांचा साधा उल्लेख पण करत नाही, महाराष्ट्राच्या पुनर्जागरामध्ये यांचा काही वाटा नाही असे कुबेरांना वाटते काय ? असा सवाल कोकाटे यांनी केला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |