05:23pm | Dec 01, 2020 |
कराड : कराड शहरात सापळा रचून दोघा चैन स्नॅचर्सना जेरबंद करण्यात कराड गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले असून या दोघांकडून तब्बल 6 गुन्ह्यांची उकल झाली आहे. तसेच 5 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत चैन स्नॅचिग करणार्या गुन्हेगारांबाबत खास गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली होती की, दुशेरे, ता.कराड गावातील दोन इसम हे महागड्या पल्सर सारख्या गाड्या घेवून चैन स्नॅचिंग करत आहेत. सदर अनुषंगाने शोध घेतला असता. चोरी करणारे दोन्ही आरोपी हे 15 दिवसापासून फरार झालेले होते. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने त्यांची माहिती काढून आरोपी कर्नाटक राज्यात पळून जाण्याच्या बेतात असताना त्यांना शनिवार दि.28 रोजी सकाळी 10 वा. दत्तचौक कराड याठिकाणी सापळा लावून अटक करण्यात आली आहे. संबंधित आरोपींकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता आरोपींनी कराड शहर पो.ठाणे हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी 6 चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. यामध्ये 4 लाख 46 हजार रुपये किंमतीची सोन्याची 6 मंगळसुत्र व गुन्ह्यात वापरलेल्या 1 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या 2 मोटार सायकल असा एकुण 5 लाख 66 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यातील आरोपींंना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने पोलीस कस्टडी दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा कराडचे सपोनि विजय गोडसे हे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोउपनि भरत पाटील, पोउपनि भैरवनाथ कांबळे, सफौ राजेंद्र पुजारी, पोहवा सतीश जाधव, नितीन येळवे, जयसिंग राजगे, पोलीस नाईक संजय जाधव, सचिन साळुखे, पोलीस कॉस्टेबल मारुती लाटणे, विनोद माने, प्रफुल्ल गाडे, तानाजी शिंदे, आनंदा जाधव यांनी केली आहे.
मतदार नोंदणी अभियानांतर्गत मतदार नोंदणीचे आवाहन |
पुसेगाव व कोरेगाव येथे एकूण दोन लाख 93 हजारांचा गुटखा जप्त |
बेघरांना घरे देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांना सादर |
रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप करावे |
जनता बँकेच्यावतीने सत्कार हा माझा घरचा सत्कार : शहाजी क्षीरसगार |
मोबाईल आहे, नेट नाही; त्यामुळे वर्क होईना |
फलटण ग्रामीण पोलिसांनी केली दरोडा टाकणारी टोळी जेरबंद |
जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा 56 हजार पार |
सातपुते यांचा 'तेजस्वी' पायलट प्रयोग साताऱ्यात राबवा |
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन |
खून, खुनाचा प्रयत्न करणारे जिल्ह्यातील १८ जण तडीपार |
सारंग मंगल कार्यालयाच्या मालकासह विवाह आयोजकांवर दंडात्मक कारवाई |
केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी |
सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव निधी मिळेल |
नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश |
मोबाईल आहे, नेट नाही; त्यामुळे वर्क होईना |
फलटण ग्रामीण पोलिसांनी केली दरोडा टाकणारी टोळी जेरबंद |
जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा 56 हजार पार |
सातपुते यांचा 'तेजस्वी' पायलट प्रयोग साताऱ्यात राबवा |
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन |
खून, खुनाचा प्रयत्न करणारे जिल्ह्यातील १८ जण तडीपार |
सारंग मंगल कार्यालयाच्या मालकासह विवाह आयोजकांवर दंडात्मक कारवाई |
केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी |
सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव निधी मिळेल |
नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश |
जिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |
इच्छा शक्तीच्या दुष्काळाने सातारा जिल्ह्यातील शेतकरी पुरस्कारापासून वंचित |
157 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
माराच्या भितीपोटी अल्पवयीन मुलाने केला चोरीचा बनाव |
ग्रेड सेपरेटरमध्ये केलेले स्टंट युवकास भोवले; गुन्हा दाखल |