01:43pm | Aug 09, 2020 |
सातारा : जिल्हा रुग्णालयातील एका वार्डामध्ये सुमारे 12 दिवसांपूर्वी स्त्री जातीचे मृत अर्भक स्वच्छतागृहातील पाईपमध्ये आढळले होते. या घटनेची सातारा टुडे ने सर्वप्रथम वृत्त प्रकाशित केले होते. तसेच जिल्ह्यातील इतर माध्यमांनीही हे प्रकरण चांगलेच लावून धरले होते. डॉ. गडीकरांच्या या भानगडीची आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी गंभीर दखल घेत आज जिल्हा दौर्यावर असतानाच त्यांची तडकाफडकी बदली केली.
28 जुलै रोजी सातारा जिल्हा रुग्णालयातील एका वॉर्डामध्ये स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळून आले होते. याबाबतचे वृत्त बुधवार दि. 5 ऑगस्ट रोजी सातारा टुडे मध्ये सचित्र प्रकाशित झाले होते. या वृत्तामुळे जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली होती. सातारा टुडेच्या वृत्ताची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती गठीत केली होती. परंतू हे प्रकरण आपल्या अंगाशी येतेय याची भनक लागल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गडीकर यांनी ते स्त्री जातीचे मृत अर्भक स्वच्छतागृहातून बाहेर काढणार्या सफाई कर्मचार्यास आपल्या दालनात बोलावून या प्रकरणाची बाहेर कुठे वाच्यता केलीस तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. तसेच त्याला कामावरुन काढले होते. संबंधित कर्मचारी परप्रांतीय असल्याने तसेच कामावरुन काढल्यामुळे मानसिक तणावाखाली गेला होता. यातूनच परवा त्याने फिनेल पिऊन आत्महत्त्येचा प्रयत्न केला होता. गेल्या दोन दिवसांपासून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉ. गडीकरांमुळेच मी आत्महत्त्या करेन, असे ठरवले होते, असा आरोपही त्या कर्मचार्याने प्रसारमाध्यमांकडे केला होता. यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गडीकरांचा पाय अधिकच खोलात रुतला होता. सातारा टुडे च्या रॅपिड वृत्तांकनामुळे हे प्रकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्यापर्यंत पोहोचले होते.
आज जिल्हा आढावा बैठकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत कराड येथे बैठक सुरु होण्याच्या अगोदरच आरोग्यमंत्र्यांनी डॉ. गडीकरांची उचलबांगडी केलेली आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील प्रसारमाध्यमे, विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी उभ्या केलेल्या लढ्याला अनपेक्षित यश मिळालेले आहे. सातारा टुडे ने हे प्रकरण बाहेर काढले नसते तर कदाचित हे प्रकरणही डॉ. गडीकर व त्यांच्या टोळीने दाबले असते. सिव्हिलमध्येच गर्भलिंग निदान चाचण्यांचे मोठे रॅकेट कार्यरत असल्यामुळे कुंपणच शेत खात असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आरोग्यमंत्र्यांनी गडीकरांच्या उचलबांगडीबरोबरच जिल्हा रुग्णालयातील या रॅकेटची पाळेमुळे खोदून काढावीत, अशीही मागणी जिल्ह्यातून होत आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |