07:54pm | Jun 22, 2021 |
फलटण : फलटण नगरपरिषदेतील कुख्यात नगरसेवक पांडुरंग गुंजवटे याने गरोदर असलेल्या एका मागासवर्गीय महिला कर्मचार्यास चारचाकी गाडीने प्रवास का करता, असे विचारत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होवून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यासंदर्भात संबंधित महिलेने तसेच फलटण शहर म्युनिसिपल कामगार संघटनेने याबाबतचा तक्रारअर्ज सातारा जिल्हाधिकार्यांसह जिल्हा पोलीस प्रमुखांना दिला आहे.
यासंदर्भात दिलेल्या तक्रारअर्जात असे म्हटले आहे की, संबंधित महिला ही फलटण नगरपरिषदेत सफाई कामगार पदावर कायमस्वरुपी कार्यरत असून सध्या तिची नियुक्ती जन्म-मृत्यू विभागात आहे. 21 जून रोजी संबंधित महिला कामावर आल्यानंतर तिने तिची चारचाकी गाडी नगरपरिषदेच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. यावेळी फलटण नगरपालिकेचे कुख्यात नगरसेवक पांडुरंग गुंजवटे याने तुझी गाडी तू पार्किंगमध्ये का लावलीस, असे म्हणत संबंधित महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच नगरपालिकेचा कर्मचारी सिद्धार्थ काकडे याला चारचाकी गाडीची हवा सोडण्यास भाग पाडले. यावेळी गुंजवटे एवढ्यावरच न थांबता त्यांनी नगरपालिकेच्या मेन गेट ला कुलूप लावून टाकले. यावेळी गुंजवटेने संबंधित महिलेस त्याच्या केबिनमध्ये बोलावून घेतले. संबंधित महिलेने मी सात महिन्यांची गरोदर असून मला डॉक्टरांनी दुचाकीवरुन प्रवास करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे मी माझ्या पतीच्या चारचाकी गाडीतून कार्यालयात येत असते, असे सांगितले. एवढ्या विनवण्या करुनही विकृती ठासून भरलेल्या पांडुरंग गुंजवटेच्या मनाला पाझर फुटला नाही. शक्तिशाली पुढाऱ्यांच्या पाठबळावर गमजा मारणार्या गुंजवटेने मला ज्ञान शिकवतेस काय? असे म्हणत पुन्हा त्या महिलेस शिवीगाळ केली. संबंधित महिला सात महिन्यांची गरोदर असून गरोदर महिलेस कशा पद्धतीने वागणूक दिली पाहिजे, याची अक्कल टक्कल पडलेल्या गुंजवटेला राहिलेली नाही. हा प्रकार घडल्यानंतर संबंधित महिला प्रचंड मानसिक तणावाखाली आहे. यासंदर्भात त्या महिलेने तसेच फलटण शहर म्युनिसिपल कामगार संघटनेने सातारा जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख, फलटण पालिकेचे मुख्याधिकारी, फलटण शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना तक्रारअर्ज दिलेला आहे. परंतू अद्याप या तक्रारअर्जाची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने पांडुरंग गुंजवटे फलटण शहरात मोकाट फिरत आहे. फलटणमधील राजकीय पुढार्यांच्या वरदहस्तामुळे फलटण नगरपालिकेतील महिलांचे जगणे मुश्किल झाले आहे. महिलांचा सन्मान करण्यास शिकविणार्या राष्ट्रवादी पक्षाने पांडुरंग गुंजवटे सारख्या विकृत नगरसेवकास त्याला तात्काळ पदमुक्त करुन त्याची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी फलटण पालिकेतील विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली आहे.
विनयभंग व ऍट्रोसिटी प्रकरणात शिक्षा लागूनही पांडू सुधारेना!
फलटण नगरपालिकेत प्रकल्पाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या महिलेस तत्कालीन उपनगराध्यक्ष तथा आजी नगरसेवक पांडुरंग गुंजवटेने मारहाण करुन शिवीगाळ केली होती. या घटनेनंतर सातारा टुडे ने पांडुरंग गुंजवटेचा रॅपिड वृत्तांकनाच्या माध्यमातून चिंधड्या उडवून त्याला पुरते 'एक्सपोज' केले होते. त्यामुळे पांडुरंग गुंजवटेची जिल्हाभरात छि: थू झाली होती. यानंतर संबंधित महिलेने याबाबतची तक्रार तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख तसेच फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल माकणीकर यांच्याकडे केली होती. यानंतर याची गंभीर दखल घेत या अधिकार्यांनी पांडु वर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देत पांडु च्या मुसक्या आवळल्या होत्या. या घटनेचा योग्य पद्धतीने तपास झाल्याने सातारा येथील सत्र न्यायालयाने ऍट्रोसिटी तसेच विनयभंग प्रकरणी दोषी ठरवून पांडु ला शिक्षा ठोठावली होती. तद्नंतर पांडु ने उच्च न्यायालयात धाव घेवून जामीन मिळवला होता. एवढे मोठे कांड होवूनही पांडु सध्या सुधारण्याचे नाव घेत नाही. शिक्षा झाल्यानंतर त्यातून बोध घेवून माणूस सुधारतो. पांडू मात्र यालाही अपवाद ठरलेला आहे.बन्सल साहेब, पांडु बरोबरच फलटण तालुक्यावर लक्ष केंद्रित करा!
तत्कालीन पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख तसेच संदीप पाटील यांनी फलटण तालुक्यातील गुंडगिरी मोडित काढली होती. अवैध खासगी सावकार, नामचीन गुंडांना मोक्के लावून संपूर्ण फलटण तालुका गुन्हेगारीमुक्त केला होता. परंतू या दोन्ही अधिकार्यांची बदली होताच फलटणमधील गुन्हेगारांनी पुन्हा हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कायद्याच्या दट्ट्यामुळे बिळात लपून बसलेले पांडुरंग गुंजवटे सारखे सरकार बदलताच त्यांनी आपला उपद्रव दाखवण्यास पुन्हा सुरुवात केली आहे. एका महिलेच्या प्रकरणात शिक्षा लागूनही दुसर्या महिलेस डिवचण्याचे काम त्याने केलेले आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक या नात्याने अजयकुमार बन्सल यांनी कोणताही राजकीय दबाव व बाळगता फलटणमधील गुन्हेगारांना पुन्हा सडकून काढले पाहिजे. असे घडले तरच पांडु गुंजवटेसारख्या प्रवृत्ती पुन्हा डोके वर काढणार नाहीत.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |