07:15pm | Nov 29, 2022 |
सातारा : महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून मोटार सायकल वरून पलायन करणाऱ्या कोंडवे, तालुका सातारा येथील दोन साखळी चोरांना कोरेगाव पोलिसांनी तपासानंतर ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
इंद्रजीत मोहन गुरव वय 24 राहणार कोंडवे व अभिजीत प्रदीप महामुनी राहणार कोंडवे वय 27 अशी संशयितांची नावे आहेत.
या प्रकरणाची माहिती अशी, दिनांक 6 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता फिर्यादी वैशाली विजय खटावर राहणार एमएसईबी ऑफिसच्या पाठीमागे कोरेगाव या घराच्या बाहेर उभ्या असताना मोटरसायकल वरून आलेल्या दोन अनोळखी इसमानी त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र जबरीने ओढून चोरी करून नेले. त्यानुसार कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक नितीन सावंत आणि गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पथकाने तपास सुरू केला.
तपास पथकाने घटनास्थळी भेट देऊन आजूबाजूचे साक्षीदार यांच्याकडे विचारपूस केली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे हा गुन्हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार इंद्रजीत गुरव, अभिजीत महामुनी यांनी केल्याचे स्पष्ट झाले. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले आहे.
या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, सचिन साळुंखे, समाधान शेडगे, अविनाश घाडगे, सायबर पोलीस ठाण्याचे सुशांत कदम, महेश पवार यांनी सहभाग घेतला होता.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |