03:05pm | Jun 29, 2020 |
नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांत नितीन मेनन यांनी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निभावलेली चांगली कामगिरी लक्षात घेता त्यांची एलिट पॅनलमध्ये निवड करण्यात आली आहे. श्रीनीवास वेंकटराघवन आणि सुंदरम रवी यांच्यानंतर एलिट पॅनलमध्ये स्थान मिळालेले नितीन मेनन हे भारताने तिसरे पंच ठरले आहेत.
भारताचे पंच नितीन मेनन यांची 2020-21 वर्षासाठी आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचांची भूमिका बजावण्यासाठी आयसीसी प्रत्येक वर्षाला एलिट पॅनलमध्ये चांगली कामगिरी करणार्या पंचांचा समावेश करत असते.
नितीन मेनन यांनी आतापर्यंत 3 कसोटी, 24 वन-डे आणि 16 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये पंचांची भूमिका निभावली आहे. आयसीसीचे जनरल मॅनेजर जिऑफ ऑल्ड्रीस, माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर, सामानाधिकारी रंजन मगदुले आणि डेव्डिड बून यांच्या समितीने मेनन यांची एलिट पॅनलमध्ये निवड केली आहे. यामुळे नितीन मेनन यापुढे भारताव्यतिरीक्त अन्य देशांतील क्रिकेट सामन्यात पंच म्हणून कामगिरी बजावताना दिसतील.
एलिट पॅनलमध्ये निवड झाल्यानंतर नितीन मेनन यांनी आनंद व्यक्त केला आहे. एलिट पॅनलमध्ये माझा सहभाग होणं ही माझ्यासाठी आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे माझ्यावरची जबाबदारी अधिक वाढणार असून माझ्याकडून चांगलं काम अपेक्षित आहे याची मला जाणीव आहे. यापुढे मिळेल त्या संधीचा चांगला वापर करण्याचं मी निश्चीत केल्याची प्रतिक्रीया मेनन यांनी आयसीसीच्या संकेतस्थळाशी बोलताना दिली. नितीन मेनन यांच्याव्यतिरीक्त सध्या आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये अलिम दार, कुमार धर्मसेना, मारियस इरॅस्मस, ख्रिस गॅफनी, मायकल गॉग, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबुरो, ब्रुस ऑक्सनफर्ड, पॉल रेफेल, रॉड टकर आणि जोएल विल्सन यांचा समावेश आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |