07:59pm | Sep 12, 2020 |
सातारा : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती आणल्यामुळे आता राज्य शासनाने तातडीने अध्यादेश काढावा यासाठी सर्व आमदार व खासदारांनी सरकारवर दबाव आणावा अन्यथा असहकार आंदोलन करावे लागेल, असा इशारा सातारा जिल्ह्याच्या मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
सातारा जिल्ह्याच्या मराठा क्रांती मोर्चाची गोपनीय बैठक शनिवारी झाली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती देताना जी कारणे दिली त्यावर चर्चा झाली. न्यायालयीन लढाई हा एकमेव मार्ग आता मराठा समाजासमोर असल्याने या मार्गाने लढाई लढण्यासाठी अभ्यासाअंती उतरण्याबाबत मराठा समाजातील सामाजिक कार्यकर्ते, विधीज्ञ, अभ्यासक यांनी धोरणात्मक निर्णय घ्यावेत, अशी जाहीर भूमिका बैठकीत मांडण्यात आली.
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने मराठा समाजावर अन्याय होणार आहे. या अन्यायाच्याविरोधात समाजातील तरुण पेटून उठले आहेत. मराठा क्रांती मोर्चालाही निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजाच्या जीवावर व मतांवर आजपर्यंत मोठे झालेल्या राज्यातील आमदार, खासदार, मंत्र्यांनी तातडीने राज्य सरकारला अध्यादेश काढण्यासाठी दबाव आणावा. आमदार, खासदार, मंत्र्यांनी जर राज्य सरकारवर असा दबाव आणला नाही तर त्यांच्याविरोधात असहकार आंदोलन करावे लागेल, असा इशाराही या बैठकीत देण्यात आला.
केंद्रात वेगळे सरकार व राज्यात वेगळे सरकार आहे. भाजपच्या आमदार व खासदारांनी केंद्रात पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांशी तातडीने चर्चा करावी तर शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांनी राज्यातील सरकारबरोबर अध्यादेशाबाबत तातडीने चर्चा करावी. भाजप व मित्रपक्षांच्या आमदारांनी राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांवर दबाव आणून या प्रक्रियेत तातडीने मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घेतली गेली पाहिजे, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.
मराठा आरक्षणाचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत केंद्र व राज्य सरकारने कोणतीही भरती करु नये. मराठा समाजातील विद्यार्थ्यांवर व युवकांवर अन्याय होवू नये यासाठी केंद्र व राज्य सरकारने नव्या योजना लागू कराव्यात, अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली.
राज्य पातळीवर मराठा क्रांती मोर्चा जो निर्णय घेईल त्यानुसार पुढची वाटचाल राहील, तोपर्यंत तालुका पातळीवरील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आपापल्या भागातील आमदारांशी तातडीने चर्चा करावी. राज्याच्या मराठा क्रांती मोर्चाने कोणत्याही आंदोलनाचा निर्णय घेतला तर सातारा जिल्हा त्यात पुढे असेल, असेही या बैठकीत ठरवण्यात आले.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |