बुध: कोरोनाच्या या जागतिक महामारीने संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. रक्ताच्या नात्यात दुरावा पडला आहे. तिथे माणुसकी कशी शोधावी? हाच मोठा प्रश्न आहे. कोरोनाग्रस्तांनी तुडुंब भरलेले दवाखाने, अपुरी पडणारी आरोग्य व्यवस्था व त्यामुळे हतबल झालेला मानव. ही आजची 21 व्या शतकातील विज्ञाननिष्ठ समाजाची अवस्था पाहिल्यावर खरंच आपण अश्वयुगात तर नाही ना? हा प्रश्न पडलेला दिसत आहे. पण या संकटात सुध्दा काही समाजसेवक तन-मनाने जनतेची सेवा करत आहे. अशाच एक अदृश्य योध्दा म्हणजे प्रताप जाधव.
80% समाजकारण व 20% राजकारण हा मंत्र शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या त्यांच्या राजकीय संघटनेच्या प्रत्येक शिवसैनिकांस घालून दिला आहे. आजही त्याची अमंलबजावणी कट्टर शिवसैनिक त्यांच्या कार्यातून सिध्द करण्याचा प्रयत्न करतो. कोरोनाच्या या संकंटकाळात अशाच एका जिगरबाज शिवसैनिक उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांची अदृश्य कहाणी आपल्यासमोर मांडताना आम्हांस विशेष आनंद होत आहे.
प्रताप जाधव हे उपजिल्हाप्रमुख तसेच श्री सेवागिरी देवस्थानचे विश्रस्तही आहेत. सद्यास्थितीस ट्रस्ट माध्यमातून मोफत रूग्णवाहिका समाजातील गरजु लोकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. परवा एक कोरोनाग्रस्त अस्वस्थ असताना नेमके ड्रायव्हर उपलब्ध होत नव्हता कारण कोरोनाग्रस्तांबरोबर कोरोना खुले आमंत्रण पण यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हा पठ्या स्वतः त्या रोगी व्यक्तीला कोवीड सेंटरला घेऊन गेला व पुढील उपचारासाठी योग्य तजवीजही केली. कोरोनाच्या महामारी असे दिव्य फक्त मास्क घालून करणे याला वाघाचे काळीज लागते व ते वाघाचे निशाण असलेल्या संघटनेच्या बछड्याने सिध्द करून दाखविले आहे. खरं आज अशाच अदृश्य बछड्यांची समाजाला गरज आहे. जे कुठलाही बडेजाव न करता लोकांच्या मदतीला धावले पाहिजेत कारण आज समाजाला पैसा नव्हे माणुसकी गरज आहे. कारण आपण पाहिलेले आहेच की, करोडो रूपयांची संपत्ती असलेले मालकाचे अंत्यविधीला आप्तांनाही परवानगी मिळू शकली नाही.
कुटुंबासह जनमानसाची ही सेवा करा: प्रताप जाधव
कारोना या महारोगाने सर्व जनजीवन उद्ध्वस्त झाले असून गोरगरीब जनता हलाकित जगत आहे. व्यापार, रोजगार पूर्णपणे रसातळला गेला आहे. आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. आपल्या परिवाराबरोबर एक शिवसैनिक म्हणून जनमानसाची सेवा करणे आपली जबाबदारी आहे. म्हणून आपली काळजी घेत इतर लोकांना होईल तेवढी मदत करणे गरजेचे आहे.
ना.एकनाथजी शिंदे यांच्या मदतीने आपल्या भागासाठी थोड्याच दिवसात रुग्णवाहिका उपलब्ध होणार असून त्या माध्यमातून लोकांची सेवा करण्यास मिळेल. मास्क वाटणे, सॅनिटायझर वाटणे, फवारणी, माहिती पत्रक वाटणे असे विविध उपक्रम राबवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
वेळ निघून गेल्यावर काही उपयोग नाही लोकांना आता आपली गरज आहे स्वताची काळजी घेत इतरांची ही मदत करा. नुसते ब्यानरबाजी, पत्रक काढून उपयोग नाही, जनता जागृत आहे. कोण काय करत आहे, हे डोळे उघडे ठेवून पाहत आहे, असा टोला प्रताप जाधव यांनी दिला आहे.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |