सातारा : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 11 जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये तीन हॉटेल व्यवसायिक आणि विनाकारण वाहनातून फिरणार्या 8 जणांचा समावेश आहे.
याबाबत माहिती अशी, काशीळ, ता. सातारा येथे महामार्गाकडेला हॉटेल अजिंक्यचे मालक अमोल दिलीप कदम (वय 27, रा. काशीळ) आणि रॉयल रेस्टो हॉटेलचे मालक समीर सलीम मुलाणी (वय 25, रा. काशीळ) यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करत हॉटेल्स सुरू ठेवले. याप्रकरणी पोलिस हवालदार विजय साळुंखे यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुशी, ता. सातारा येथे राजयोग लॉजिंग हे रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी अविनाश प्रकाश काळे (वय 19, रा. सरताळे, ता. जावली), सचिन रामचंद्र माळवदे (वय वय 40, रा. नागेवाडी, ता. सातारा), योगेश बर्गे (रा. अजिंक्यनगर, ता. कोरेगाव) यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, बोगदा ते यवतेश्वर मार्गावर दि. 16 रोजी रात्री 12 च्या सुमारास विनाकारण वाहनातून फिरणार्या सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रेयस सुर्यकांत कदम (वय 22 रा. मंगळवार पेठ, सातारा, संभाजी रवींद्र पवार (वय 35,रा. केसरकर कॉलनी), शिवांकुर विजय बगाडे (वय 18, रा. मोरे कॉलनी सातारा), योगेश राजेंद्र जाधव (वय 21, रा. मोरे कॉलनी सातारा), जोतिबा मोरू पाटील (वय 34, रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा), संदीप तुकाराम पवार (वय 46, रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) अशी त्यांची नावे आहेत.
तसेच बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे दि. 16 रोजी 12 च्या सुमारास आनंद विठ्ठल पोळ (वय 39, रा. मल्हारपेठ सातारा) आणि जयवंत शिवदास कांबळे हे विनाकारण फिरताना आढळून आले. त्यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |