03:51pm | May 24, 2021 |
फलटण : फलटणमधील एकाला हनिट्रॅप च्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून तब्बल 15 लाख 50 हजारांची खंडणी घेणार्या 6 जणांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील तिघांना अटक होवून त्यांना न्यायालयाने पोलीस कस्टडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.15 मे 2020 रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याचा सुमारास तक्रारदार त्यांच्या दुकानगाळ्यात बसलेले असताना अजित घोलप याने लक्ष्मीनगर येथील मानस प्लाझा बिल्डिंगमध्ये भेंडीचा व्यापारी आलेला आहे ते भेंडी घेणार आहेत, असे सांगून तक्रारदारास स्कुटी मोटार सायकलवर बसवून तेथे घेऊन आला. त्यावेळी मानस प्लाझा बिल्डिंग येथे एक मुलगी व राजू बोके, मनोज हिप्परकर, रोहित भंडलकर हे देखील बसलेले होते. त्यांनी तक्रारदारास मारहाण करून त्याचे कपडे काढून त्या मुलीच्या अंगावर ढकलून दिले व त्यांचे फोटो काढले. त्यानंतर गिरवीकडे जाणार्या रस्त्यावरील ओढ्यात अजित घोलप व विजय गिरी गोसावी हे जबरदस्तीने पिवळ्या रंगाच्या दुचाकीवर बसवून घेऊन गेले. तेथे राजू बोके, मनोज हिप्परकर व रोहित भंडलकर हे देखील त्यांच्याकडील दुचाकीवरून त्याठिकाणी आलेले होते. तेथे आल्यावर तिघांनी मिळून तक्रारदारास मारहाण करून आता त्या मुलीला तुझ्या विरोधात पोलिसांत बलात्काराची तक्रार द्यायला सांगतो, अशी भीती दाखवून दमदाटी करून वीस लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी समाजात बदनामी होईल म्हणून 15 लाख 50 हजार रुपये त्यांना दिले.
यानंतर पोलीस प्रशासनाने तक्रारदारास सुरक्षेची ग्वाही दिल्यानंतर तक्रारदाराने फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केलेला आहे, अशी माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी दिली. जर अशा प्रकारची घटना कोणाबरोबर घडली असल्यास त्यांनी विनासंकोच फलटण शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. त्यांचे नांव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलीस निरीक्षक किंद्रे यांनी स्पष्ट केले.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. राऊळ, पोलीस उपनिरीक्षक एस. ए. बनकर, सहाय्यक फौजदार एस. एन. भोईटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही.पी.ठाकूर, पोलीस नाईक एस. डी. सुळ, एस.ए. तांवे, एन. डी. चतुरे, व्ही. एच. लावंड, पोलीस शिपाई ए. एस. जगताप यांनी केला आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |