12:30pm | Jul 02, 2021 |
पुसेगाव: पारंपरिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा कमी कष्ट, जादा नफा मिळवून देणार्या आधुनिक शेती करण्याकडे शेतकरी वर्ग वळताना दिसत आहे. खटाव तालुक्यातील काही शेतकर्यांना अद्याप त्या पिकाचे नाव ही माहीत नाही. त्या औषधी वनस्पती जिरेनियमचा पहिला तोडा (कटिंग) पवारवाडी (वर्धनगड, ता.खटाव) येथील निवृत्त सुभेदार व शेतकरी विश्वनाथ विठ्ठल पवार यांनी यशस्वीपणे घेतला आहे. सुमारे 22 गुंठ्यांत त्यांना पहिल्याच कटिंगला 12 टन जिरेनियम निघाले आहे.
निसर्गाचा ढासळत चाललेला समतोल व लहरीपणामुळे खरीप, रब्बी हंगामातील पिकांची जोपासना करताना बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. कोणतेही पीक शेतात लावल्यापासून ते हातात येई पर्यंत शेतकर्यांना खात्री राहिली नाही. मजुरांची कमतरता, खतांचे वाढलेले भाव, उत्पादीत केलेल्या मालाला हमीभाव नसणे,यामुळे सातत्याने होणारे मोठे आर्थिक नुकसान सहन करण्याची क्षमता शेतकर्यांकडे उरलीच नाही. त्यामुळे शेतकरी हळूहळू पारंपरिक शेती ऐवजी कमी कष्टाची पण जादा नफ्याच्या शेती कडे वळल्याचे दिसत आहे.
खटाव सारख्या दुष्काळी भागात जी शेती शेतकर्यांसाठी फायदेशीर ठरेल, अशी सुगंधी व औषधी वनस्पती जिरेनियम ची शेती करण्याकडे शेतकरी वळला आहे. साधारणतः नोव्हेंबर ते फेब्रुवारीच्याच्या दरम्यान या वनस्पतीची लागवड केली जाते. वास्तविक पाहता 25 ते 30 डिग्री तापमानात या वनस्पतीची वाढ जोमाने होत असल्याने फेब्रुवारीत लागवड केल्यास चांगला फायदा होतो. या वनस्पतीची एकदा लागवड केल्यास किमान तीन चार वर्ष उत्पादन मिळते. पिक एका वर्षात तीन वेळा कापणीला येते. पुन्हा लागण करण्याची गरजच नसल्याने शेतकर्यांना आर्थिक ताण येत नाही. एका एकरमध्ये 10 हजार रोप लागतात. केवळ पहिल्याच वर्षी एकरी सुरूवातीला खर्च 70 ते 80 हजार येतो. इतर पिकाच्या तुलनेत फवारणी व खते यामध्ये 75% खर्च कमी आहे. एक एकर उसाला जेवढे पाणी लागेल तेवढ्या पाण्यावर चार एकर जिरेनियमची शेती होऊ शकते. गवतवर्गीय पीक असल्याने त्याला औषध व इतर खर्च फारच कमी प्रमाणात होतो.
या वनस्पतीच्या शेतात आंतरपिक म्हणून शेवगा हे पिक उत्तम असते. या शेवग्याच्या उत्पादनावर लागवडीचा खर्च निघून जातो. या पिकापासून ऑईल निर्मिती केली जाते. एका एकरात 30 ते 40 लिटर ऑईल वर्षाला मिळते. एक लिटर ऑईलची किंमत सुमारे 12000 हजार रु मिळते. म्हणजे एक एकरमध्ये एका वर्षात चार ते पाच लाख रुपये किमतीचे तेल संबंधित कंपनीत या वनस्पती पासून काढले जाते. त्याचा हायडेनसिपरफ्यूम व कॉस्मेटिकसाठी याचा वापर केला जातो.फरफ्युम मध्ये जी नॅचरिलीटी लागते ती या मधूनच मिळते.म्हणुन जिरेनियम शिवाय पर्याय नाही.
या वनस्पतीच्या तेलाची भारतात दर वर्षाला 200 ते 300 टनाची गरज आहे.पण सध्यस्थिती पहाता भारतात वर्षाला 10 टन पण ऑईल (तेल) निर्मिती होत नाही. त्यामुळे या आणी अशा सुगंधी औषधी वनस्पतीची लागवड जास्तीतजास्त क्षेत्रात होणे अधिक फायदेशीर ठरणारे आहे.. अशा या औषधी वनस्पतीची भारतात लाखो एकर शेती केली तरी कमीच आहे.
बदलत्या हवामानानुसार सध्या शेतात घेतली जाणारी कांदा, बटाटा, आले, ऊस अशी नगदी पिके ही बिनभरोशाची आहेत. प्रचंड खर्च करून फायदा होईल का नाही हे शेवट पर्यंत शेतकर्यांना समजत नाही. त्यामुळे कमी कष्ट व जादा नफा मिळवून देणारी व हमखास शेतकर्यांच्या दारात लक्ष्मी आणणारी सुगंधी व औषधी जिरेनियम ची शेती शेतकर्यांना आर्थिक दृष्टीने निश्चितच सक्षम करेल, म्हणूनच अधिकाधिक शेतकर्यांनी जिरेनियम शेती करण्याची आवश्यकता आहे.
- विश्वनाथ पवार (निवृत्त सुभेदार)
जिरेनियम शेती उत्पादक, पवारवाडी (वर्धनगड) ता. खटाव
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |