04:54pm | Nov 30, 2021 |
सातारा : अननसामध्ये जीवनसत्त्व 'ए', अँण्टीऑक्सीडंटस् आणि भरपूर प्रमाणात पौष्टिक तत्त्वे असतात. त्यामुळे अननस खाल्ल्याने किंवा त्याचे सरबत प्यायल्याने डोळे निरोगी राहतात. पोटाच्या तक्रारींपासून सुटका होते.
अननस केस, त्वचा आणि हाडांसाठी गुणकारी आहे. चेहऱ्यावरील मुरुमं, त्वचेवर येणारे चट्टे तसेच कोणत्याही त्वचाविकारावर अननस अत्यंत गुणकारी आहे. अननसामध्ये जीवनसत्त्व 'ए' आणि अँण्टीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे डोळ्यांच्या समस्या दूर व्हायला मदत होते. लहान मुलांना अननसाचे सरबत जरूर प्यायला द्यावे. यामुळे त्यांच्या डोळ्यांची दृष्टि सुधारते. लहान वयात डोळ्यांच्या तक्रारी उद्भवत नाहीत.
नैसर्गिकरित्या अननसामध्ये फॅट बर्नरचे गुणधर्म आहेत. अननस खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही. पोट भरलेले राहते. वजनही संतुलित राहायला मदत होते. दात आणि हाडांच्या मजबुतीकरिता अननसाचा रस पिणे हा चांगला पर्याय आहे. या रसामध्ये कॅल्शियम आणि मॅगनीजचे प्रमाण जास्त असल्याने ते दात आणि हाडे मजबूत करतात. दात आणि हाडे दुखणे किंवा सूज येण्याची समस्या असल्यास अननसाचा रस प्यावा.
अननसाचे ज्यूस पिणे त्वचेकरिताही अत्यंत फायदेशीर आहे. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व सी आणि अँण्टीऑक्सीडंट असतात त्यामुळे मुरुमं, उन्हामुळे त्वचा काळवंडणे आणि त्वचा टोनिंगकरिता या ज्यूसमुळे फायदा होतो. त्वचा हायड्रेट आणि नितळ राहण्याकरिता अननसाचे ज्यूस प्यावे.
जीवनसत्त्व 'सी' भरपूर प्रमाणात असल्यामुळे अननस चवीला आंबट गोड लागते. यामुळेच पचनक्रियेशी संबंधित सर्व तक्रारी दूर व्हायला मदत होतात. शरीरात रक्त कमी असल्यास अननस खावे. आजारी व्यक्तिच्या शरीरातली खर्च झालेली शक्ती लवकर भरून काढण्यासाठी अननसाचा ज्यूस दिला जातो.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |