02:32pm | Aug 13, 2022 |
सातारा : शिंदे व फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई हे पहिल्यांदाच आज साताऱ्यात आले. यावेळी त्यांनी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालुन अभिवादन केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री शंभूराज देसाई यांनी एकनाथ शिंदे गटात सहभागी होवून बंडखोर ठरले. त्यांच्या बंडखोरीने जिल्ह्यातील सर्वांनाच आश्चर्याचा धक्काही बसला होता. त्यानंतर शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी खुद्द येवून पाटण तालुक्यात जाहीर सभा घेत देसार्इंवर घणघाती टिकाही केली होती. त्यानंतर शिंदे गट व शिवसेना यांच्यात न्यायालयीन सुरु असताना अखेर मंत्री मंडळाची रचना जाहीर झाली. त्यात आमदार शंभूराज देसाई यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला.
शंभूराज देसाई यांच्या मंत्री पदाची घोषणा होताच पाटण तालुक्यासह साताऱ्यातील देसाई यांच्या कोयना दौलतसमोर फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला होता. त्यानंतर मंत्री देसाई शनिवारी साताऱ्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी मंत्री देसाई यांनी पोवईनाक्यावर ढोलताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले व त्यानंतर ते आपल्या निवासस्थानी दाखल झाले.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |