05:58pm | Jun 22, 2022 |
सातारा : स्वराज्य नागरी पतसंस्थेच्या अनुषंगाने पोलिसात खोट्या तक्रारी केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी दिगंबर आगवणे याच्यावरच गुन्हा दाखल केला असून यामुळे आगवणेच्या माध्यमातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची बदनामी करण्याचे रामराजे नाईक निंबाळकर यांचे षडयंत्र उघडे पडले असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे समर्थक अनुप शहा यांनी सातारा येथील पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जगदीश उर्फ बाळासाहेब कदम व जयकुमार शिंदे उपस्थित होते.
गेल्या काही महिन्यांपासून दिगंबर आगवणे याच्याकडून खासदार निंबाळकर यांच्यावर खोट्या तक्रारी करुन बदनामी करण्याचे सत्र सुरु होते. त्यातूनच स्वराज्ा नागरी पतसंस्थेचे चेअरमन, संचालक व व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, न्यायालयात व पोलीस प्रशासनात रामराजेंसह आगवणे यांचा खोटेपणा सिध्द झाला असल्याने पोलिसांनी आता बी समरी करुन न्यायालयात आगवणे विरुध्द गुन्हा दाखल केला असून या तक्रारीत कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दोषमुक्त केले असल्याचे अनुप शहा यांनी सांगितले.
अनुप शहा म्हणाले, दिगंबर आगवणे यानेच स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्थेकडून एक कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, तो मी नव्हेच, त्या कर्जाशी माझे काही घेणे देणे नाही असा पवित्रा घेत आगवणे याने फलटण पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यावेळीही आम्ही न्यायालय व पोलीस प्रशासनावर आमचा विश्वास असून हा सर्व प्रकार केवळ राजकीय बदनामी करण्यासाठी केला जात असल्याचे सांगितले होते. आता आगवणे याच्यावरच पोलिसांनी कलम 182 अन्वये पोलिसात एखाद्या विरुध्द हेतूपुरस्सर खोटी तक्रार दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याने रामराजेंसह आगवणे यांचे पितळ उघडे पडले आहे.
रामराजेंचीच ईडी चौकशी करावी
सभापती पदाच्या माध्यमातून रामराजे नाईक निंबाळकर यांनी नेहमीच विरोधकांना संपवण्यासाठी खोट्या तक्रारी दाखल करण्यासाठी आगवणेचा वापर करुन घेतला असून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सुरु असलेला फलटण तालुक्याचा विकास पाहता केवळ खासदारांबद्दल असलेल्या असुयेपोटी खासदारांना बदनाम करण्यासाठी पोलीस यंत्रणेवर दबाव आणला जात होता. रामराजेंना त्यांच्या आजोबांच्या नावे असलेली बँक नीट चालवता आली नाही. पण खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची स्वराज नागरी पतसंस्था चांगल्या प्रकारे सुरु असल्याने रामराजेंना असुया वाटत होती. आता आम्ही शांत बसणार नाही उलट रामराजेंचीची ईडी चौकशी करावी, अशी आमची मागणी असल्याचे शहा यांनी सांगितले.
कायद्याच्या माध्यमातून त्यांचे दात त्यांच्या घशात घातले
वास्तविक पाहता विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे यांच्या चिथावणीने दिगंबर आगवणेची प्रवृत्ती फलटण तालुक्यात बळवली होती. खोट्या गुन्हे दाखल करण्यात मास्टर असलेले सन्माननीय रामराजे हे सातत्याने प्रत्येकावर खोटे गुन्हे घालायचे आणि त्याला राजकीयदृष्टया विरोधकांनान उध्वस्त करायचा प्रयत्न करायचा असे करत आहेत. मात्र या सगळ्याला पुरुन उरुन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजेंचे दात कायद्याच्या माध्यमातून त्यांच्या घशात घालण्याचे काम केले. आम्ही त्यावेळी पोलीसांना सगळी कागदपत्र दाखवली मात्र तरीसुद्धा माजी सभापती रामराजे यांनी दबाव आणून पोलिसांवर दबाव आणला. आगवणेला पुढे करुन ते नेहमीच शिखंडी युद्ध खेळतात हा प्रकार आता रामराजे यांनी बंद करावा, असेही अनुप शहा यावेळी म्हणाले.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |