04:37pm | Feb 25, 2021 |
अहमदाबाद: इंग्लंड विरूध्द सुरू असलेल्या तिसर्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी कमाल करत इंग्लंडला 112 धावांवर रोखले. परंतू दुसर्या दिवशी भारतीय फलंदांजीही पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. भारतीय संघाला इंग्लंडने 145 धावांत गुंडाळले. इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि फिरकीपटू जॅक लीच याच्या फिरकीपुढे टीम इंडियाच्या दिग्गजांनी गुडघे टेकले. लीच-रुट जोडीनं 9 गडी बाद करत भारतीय संघाला 145 धावांत गुंडाळलं.
66 धावा करणार्या रोहित शर्माचा अपवाद वगळता एकाही भारतीय खेळाडूला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. पहिल्या डावांत भारतीय संघाला फक्त 33 धावांची आघाडी मिळाली. जो रुट यानं पाच बळी घेत भारतीय संघाचं कंबरडं मोडलं. दुसर्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय संघाला सात गडी गमावत फक्त 46 धावा जोडता आल्या.
पहिल्या दिवशी 57 धावांवर नाबाद असणारा रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे दुसर्या दिवशी लागोपाठ तंबूत परतले. मुंबईकर फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला. जॅक लीच यानं सर्वात आधी अजिंक्य रहाणेचा अडथळा दूर केला. त्यानंतर जम बसलेल्या रोहित शर्मालाही तंबूचा रस्ता दाखवत भारताला अडचणीत पाडलं.
अनुभवी जोडी मैदानाबाहेर गेल्यानंतर सर्व मदार नवख्या ऋषभ पंतवर होती. मात्र, कामचलाऊ फिरकी गोलंदाज आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट यानं ऋषभ पंत आणि वॉशिंगटन सुंदर यांना माघारी धाडलं. अवघ्या 125 धावांवर भारतीय संघाचे आठ फलंदाज माघारी परतले आहेत. अजिंक्य रहाणे 7 आणि ऋषभ पंत 1 धावेवर स्वस्तात बाद झाले. रविचंद्रन अश्विन 17 धावा काढून तंबूत परतला. अश्विनला जो रुट यानं बाद केलं. सध्या पहिल्या डावांत भारतीय संघाकडे फक्त 22 धावांची आघाडी आहे. लोकल बॉय अक्षर पटेल याला फलंदाजीत अपयश आलं. शून्य धावसंख्येवर रुट यानं त्याला बाद केलं.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) -
48.4 षटकांत सर्वबाद 112 (झॅक क्रॉवली 53, जो रुट 17, अक्षर पटेल 6/38, अश्विन 3/26)
भारत (पहिला डाव) -
52.2 षटकांत सर्वबाद 145 (रोहित शर्मा 66, विराट कोहली 27, जो रुट 5/8, जॅक लीच 4/54)
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |