02:22pm | Jun 23, 2022 |
वृत्तसंस्था : अफगाणिस्तानमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे हजारो लोकांचे प्राण गेले आहेत तर कित्येक जण बेघर झाले आहेत. सध्या या ठिकाणी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अफगाणिस्तानमध्ये पाक्तिका भागात 22 जूनला पहाटे शक्तिशाली भूकंप झाला असून यामध्ये 1000 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 1500 हून अधिकजण जखमी झाले आहेत, या भूकंपानंतर तालिबानने आंतरराष्ट्रीय समुदायाला मदतीचे आवाहन केले आहे.
भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी नोंदली गेल्याचं अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्व्हेने म्हटलं आहे. खोस्त नावाच्या शहरापासून साधारण 44 किलोमीटरच्या अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाचे धक्के अफगाणिस्तानच्या बहुतांश भागांसह पाकिस्तान आणि भारतातही जाणवले असं युरोपियन मेडिटेरिअन सेसमोलॉजिकल सेंटरने म्हटलं आहे.
या भूकंपात असंख्य घरं उद्धस्त झाली आहेत असं अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ते बिलाल करिमी यांनी ट्वीट करून म्हटलं आहे. दुर्घटनाग्रस्त भागाला त्वरित मदत पुरवण्याचं आवाहन संबंधित यंत्रणांना दिले आहेत. पहाटेच्या वेळेस भूकंप झाल्याने अनेकजण झोपेत होते. अफगाणिस्तानात नेहमीच भूकंप होत असतो, कारण टेक्टोनिक प्लेट्स सक्रिय असणाऱ्या भूमीवर हा देश वसला आहे. अनेक फॉल्ट लाईन्स (भूकंप होती अशा जागा) इथून जातात. यातल्या काही फॉल्ट लाईन्सची नावं आहेत चामान फॉल्ट, हरी रूद फॉल्ट, सेंट्रल बदक्षां फॉल्ट आणि दरवेज फॉल्ट.
गेल्या 10 वर्षांत अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपांमुळे सुमारे 7000 लोकांचे जीव गेलेले आहेत, असं संयुक्त राष्ट्रांच्या एका विभागाचा अहवाल सांगतो. इथे दरवर्षी सरासरी 560 लोकांचे जीव भूकंपामुळे जातात. तालिबानी अधिकाऱ्यांनी सरकारी यंत्रणांनी मदतीसाठी तत्परतेने धावून जावं असं म्हटलं आहे. कित्येक दशकं सततच्या संघर्षामुळे भूकंपविरोधी यंत्रणा तयार करण्यात या देशाला अपयश आलेलं आहे. अफगाणिस्तानातल्या संदेशवहनाच्या सुविधांवरही मोठा परिणाम झाला आहे. भूकंपामुळे अनेक मोबाईल टॉवर्स भुईसपाट झाले आहेत. इथल्या एका स्थानिक पत्रकारांनी सांगितलं की मृत्यूचा आकडा आणखी वाढू शकतो.
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |