08:50pm | Jan 17, 2022 |
कराड : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव राष्ट्रीय पुरस्कार समितीच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार या पुरस्कारासाठी एकूण १३ जणांची निवड करण्यात आली असून लवकरच या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव राष्ट्रीय पुरस्कार समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रणजित जाधव यांनी दिली.
खाशाबा जाधव राष्ट्रीय पुरस्कार समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराचे २०२२ हे प्रथम वर्ष असून त्यासाठी राज्यभरातून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार समितीकडे एकूण ६१ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले. त्यांची छाननी करून या अर्जांमधून ९ जणांची, तर समितीमार्फत ४ जणांची अशी एकूण १३ जणांची राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
त्यामध्ये आदर्श वस्ताद पुरस्कार अर्जुनवीर काकासाहेब पवार, वस्ताद विश्वासराव हारुगले, आदर्श कुस्ती संघटक पै. संग्रामसिंह कांबळे, पै. योगेश शेवाळे, आदर्श कुस्तीगीर पै. बदाम मगदूम, पै. उमेश सुळ, आदर्श महिला कुस्तीगीर पै. सोनाली तोडकर, पै. कोमल गोळे, जीवन गौरव पै. शंकर पुजारी, वस्ताद कोथळी करमाने, आदर्श क्रीडा पत्रकार वैभव गोंधळी, सचिन भोसले, तर कोरोना योद्धा पुरस्कार श्री. तातोबा पवार यांना जाहीर करण्यात आला आहे.
लवकरच पुरस्कारांचे वितरण
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची नुकतीच १५ जानेवारी रोजी जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या जयंतीदिनीच राष्ट्रीय पुरस्कार समितीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार होते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार वितरण कार्यक्रम रद्ध करण्यात आला असून लवकरच या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
- रणजित खाशाबा जाधव (अध्यक्ष, खाशाबा जाधव राष्ट्रीय पुरस्कार समिती, महाराष्ट्र राज्य)
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |