बुध: कोरोना संकटामुळे जगभर शाळा बंद झाल्या. बालक, पालक व शिक्षक यांच्यात चिंतेचे वातावरण तयार झाले. शाळा बंद झाल्यातरी शिक्षण चालू रहावे, यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग प्रभावी व यशस्वी झाला. ऑनलाईन शिक्षण हाच काळाचा महिमा झाला, असे प्रतिपादन गिरवी (ता. फलटण जि.सातारा) केंद्रसमुहाचे तंत्रस्नेही केंद्रप्रमुख अनिल कदम यांनी येथील ऑनलाईन शिक्षण परिषदेत अध्यक्षीय भाषणात केले.
सातारा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, फलटण व सातारा जिल्हा परिषद सातारा शिक्षण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन शिक्षण परिषदेत अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना केंद्रप्रमुख अनिल कदम म्हणाले, शाळा बंद, पण शिक्षण सुरु आहे. या शैक्षणिक उपक्रमांंतर्गत शिक्षकांनी व्हॉटस्अॅप, फेसबुक, युट्युब, शैक्षणिक व्हिडीओ, दिक्षा अप, फोन इन एज्युकेशन, गुगल क्लास रूम, गुगल मीट, झूम मीट, व्हिडीओ कॉलिग, कॉल कॉन्फरन्स् या विविध ऑनलाईन माध्यमातून शिक्षण चालू ठेवले आहे. रेंज व ऑनलाईन सुविधा नसलेल्या मुलांना स्वाध्याय, प्रकल्प, स्वयंअध्ययन, गृहभेटी, लेखन व वाचन साहित्य या विविध शैक्षणिक प्रयोगातून शिक्षकांनी शिक्षण सुरु ठेवले आहे.
विद्यार्थी व पालकांचे सहकार्य चांगले मिळत आहे. यावेळी कोरोना संकटकाळातील शिक्षकांचे सक्षमीकरण या विषयी संजय सावंत, शैक्षणिक दिनदर्शिका या विषयी अनिल खुडे, कोरोना संकट काळात उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणारे अभिजित रणवरे, वैशाली जगताप, प्रमोद केमधरने, अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्नपेढी तयार करणे याविषयी सुनिल जाधव या शिक्षकांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.
या ऑनलाईन शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख अनिल कदम यांनी केले. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन उमा भोसले यांनी केले. या ऑनलाईन शिक्षण परिषदेस गिरवी, निरगुडी, धुमाळवाडी, बोडकेवाडी, चाहुरमळा, जाधववाडा, जननीमळा, हराटीमळा, गुरवदरा, माळेवस्ती या विविध शाळांचे मुख्याध्यापक, उपशिक्षक हजर होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |