12:51pm | May 03, 2021 |
नवी दिल्ली: संपूर्ण जगभर कोरोनाचे थैमान सुरू आहे. अशा संकटकाळातही सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहेत. केकेआरच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने केकेआर आणि आसीबीमध्ये होणारा आजचा सामना रद्द करण्यात आला आहे.
आयपीएलच्या 14 व्या हंगामाला बसलेला मोठा सेटबॅक आहे. आज सोमवारी होणारी कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील लढत पुढे ढकलण्यात आली आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघातील अनेक खेळाडूंची प्रकृती बरी नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. नियोजित वेळेनुसार ही लढत आज संध्याकाळी 7 वाजता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार होती.
आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सुरूवात 9 एप्रिल रोजी झाली होती. आयपीएल सुरू होण्याआधी काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला करोनाची लागण झाली होती. पण बायो बबलमध्ये आलेल्या कोणत्याही व्यक्तीला करोना झाला नव्हता. आता स्पर्धा सुरू असताना प्रथमच बायो बबलमधील खेळाडूंना करोना झाल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे.
मला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे मुख्य कार्यकरी अधिकारींकडून मेसज आला आहे. आज होणारी लढत पुढे ढकलण्यात आली आहे. आजच्या सामन्याची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचीव अनिल पटेल यांनी सांगितले.
कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणार्या वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |