10:02pm | Feb 22, 2022 |
वाई : हरिहरेश्वर बँक घोटाळ्याची व्याप्ती वाढली असून बनावट कर्ज प्रकरण दाखवून ४ कोटी ४९ लाख रुपयांचा गैरव्यवहार आणखी एक गुन्हा अजित खामकर, नंदकुमार खामकर यांच्यासह १८ जणांवर दाखल झाला आहे.
येथील हरिहरेश्वर बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी यापूर्वी ३७ कोटी ४६ लाख रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी २९ जणांवर गुन्हा दाखल आहे. त्यापैकी सहा जण पोलीस कोठडीत आहेत. त्याचा तपास सुरू असताना नव्याने आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
लेखा परीक्षक विष्णू साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरिहरेश्वर बँकेचे २०१९ ते २०२१ या वर्षाचे वैधानिक लेखा परीक्षण दि.२५ जानेवारी २०२१ ला पूर्ण केले. बँकेने दिलेल्या कर्ज प्रकरणाची छाननी केली असता नंदकुमार ज्ञानेश्वर खामकर व वजीर कासमभाई शेख (मयत) यांनी त्यांचे मित्र संचालक, व्यवसायिक, कामगार, भागीदार व इतर परीचित व्यक्ती यांचे नावे हरिहरेश्वर डेव्हलपर्स, एशियन डेव्हलपर्स या फर्मचे बनावट कागदपत्रे व दस्तऐवज तयार करुन गहाणखत व कर्ज प्रकरणे दाखवून तसेच बांधकाम केलेल्या सदनिका कर्जदारांना दिल्याचे दर्शवून त्यांच्या नावे कर्ज घेवून फसवणूक केलेली आहे. संचालकांनी पदाचा गैरवापर करुन स्वत:चे आर्थिक स्वार्थाकरीता सभासद, ठेवीदारांचा विश्वासघात करुन ३७ कोटी ४६ लाख ८९ हजार ३४४ रुपयांचा अपहार केल्याबद्दल जिल्हा विशेष लेखा परिक्षक वर्ग-1 यांनी त्यांच्या चाचणी लेखा परिक्षणावरुन दि. २५ ऑगस्ट २०२१ रोजी फिर्याद दाखल केली होती. तसेच ही कर्जप्रकरणे नंदकुमार ज्ञानेश्वर खामकर व वजीर शेख यांचआर्थिक फायद्यासाठी घेतल्याचे हरिहरेश्वर बँकेचे मार्फत लेखी पत्राव्दारे रिझर्व्ह बँकेस कळविलेले आहे.
उत्कर्ष नागरी पतसंस्था, कराड मर्चट क्रेडीट सोसायटी मर्या., तसेच बाळसिध्दनाथ ग्रामिण बीगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. यांनी हरिहरेश्वर बँकेत ठेवलेल्या व परत काढून घेतलेल्या गुंतवणूकीवर बनावट ठेवतारण कर्जप्रकरण तयार करुन ती रक्कम बकेच्या बनावट कर्जखात्यावर भरणा केली व परत केलेल्या गुंतवणूकीवर बोगस ठेवतारण कर्ज निर्माण करुन एकूण रक्कम रु. ४ कोटी ४९ लाख ५२ हजार ४३० चा एकूण अपहार केलेला आहे. म्हणून अध्यक्ष अजित गुलाबराव खामकर, उपाध्यक्ष जगन्नाथ बाजीराव सावंत, संस्थापक नंदकुमार ज्ञानेश्वर खामकर संचालक वजीर कासमभाई शेख व संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक वाईमध्ये आले होते. त्यांनी वाईत सर्व संशयिताना घेऊन त्यांच्या घरी जाऊन तपास केला असता काही कागदपत्रे जप्त केली आहेत व त्यांच्या गाड्या जप्त केल्या. त्यात टोयाटो फॉरचूनर, टोयाटो इटिओस व पिकअप यांचा समावेश आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे डीवायएसपी मोहन शिंदे, विक्रम कणसे, मनोज जाधव हे या पथकात होते.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |