09:22pm | May 17, 2020 |
सातारा : जावली तालुक्यातील अति दुर्गम व डोंगराळ भागातील वाड्यावस्त्यांवर उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई होत असते या वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थांना तातडीने पाणी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त वाड्यावस्त्यांवर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने टँकर सुरु करा, अशा सूचना आ. श्रीमंत छ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या.
जावली तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेऊन उपाय योजना करण्यासाठी आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा व निवारण समितीची बैठकीत झाली. या बठकीस तहसीलदार शरद पाटील, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, सौ. अर्चना रांजणे, पंचायत समिती सभापती सौ.जयश्री गिरी, सदस्य सौ.अरुणा शिर्के, विजयकुमार सुतार, ज्ञानदेव रांजणे, उपअभियंता डी. व्ही.पाटील , शगटविकास अधिकारी सतीश बुद्धे, नायब तहसीलदार सुनील मुनावळे, तपासे, शशिकांत गुरव आदी उपस्थित होते.
पंचायत समिती येथे झालेल्या बैठकीत तालुक्यामध्ये 39 गावे व 26 वाड्यांमध्ये पाणी टंचाई घोषित झाली असून त्यावर उपाय योजना करण्यासंदर्भात चर्चा झाली. 5 गावांना सेवा भावी संस्थांमार्फत पाणी पूरवठा सुरू असून 5 गावांना शासकीय टँकर सुरू करणेबाबत नुकतीच मंजुरी प्राप्त झाली आहे. तेटली,मोरावळे व खामकरवाडी येथील विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आहेत. टंचाई उपाय योजना अंतर्गत सांगवी तर्फ मेढा , रेंगडी , मुकवली ,गांजे पाटणेमाची या नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती कामांना जिल्हाधिकारी सातारा यांचेकडून मंजुरी मिळाली आहे. ज्या गावांना तीव्र पाणीटंचाई भासत असेल त्यांनी टँकर मागणीचे प्रस्ताव सादर केल्यास सत्वर टँकर मंजुरी बाबत कार्यवाही करावी अशा सुचना आ .शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. बामणोली दंडवस्ती व कुसूंबी गावचे वरील मुऱ्यावर पाणीटंचाई असलेबाबत सदस्यांनी सांगितले तसेच तालुक्यात ईतर ठिकाणी पाणीटंचाई असल्यास सत्वर उपाययोजना करण्यात यावी अशा सूचना केली. याबाबत गटविकास अधिकारी यांनी टंचाईग्रस्त गावांना मागणीनुसार टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल असे सांगितले.
कोणतीही वाडी वस्ती टंचाईग्रस्त राहू नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी. विविध गावांचा कायमचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी संबंधित विभागाने आराखडा, प्रस्ताव तयार करावा. पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून देऊ.त्यामुळे प्रशासनाने गांभीर्याने टंचाई निवारणाचे काम करावे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी सांगितले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |