03:02pm | Dec 02, 2021 |
सातारा : जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सहकारी साखर कारखान्यांची ऊसतोड बंद झाली असून द्राक्ष बागायतदारांनाही मोठा फटका बसला आहे. गहू आणि हरभरा पेरणी झाल्यानंतर शेतात पाणी साठल्याने आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. या नुकसानीची सरकारने दखल घ्यावी अशी मागणी शेतकरी करु लागले आहेत.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. सातारा, कराड, पाटण, महाबळेश्वर, वाई, खंडाळा यासह फलटण आणि माण, खटावमध्येही पाऊस सुरु असल्याने त्याठिकाणच्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. कराड परिसरातील अनेक शेतांमध्ये पाणी साठून राहिले आहे. त्यामुळे गहू आणि हरभऱ्याची केलेली पेरणी वाया जाण्याची भीती आहे.
शेतात पाणी साचल्यामुळे ऊसतोड बंद झाली असून ऊसतोड मजूरांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. ऊसतोड मजूरांच्या झोपड्यांमध्येही पाणी शिरले असून आता त्यांना त्यांचा संसार शेताच्या बांधावर थाटावा लागला आहे. अनेकांनी रात्रभर जागूनच काढली. नारायणवाडी येथील शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले असून कराड - ओंड रस्त्यावर पाणी आल्याने पाचवड फाटा येथील दुकानात पाणी शिरले आहे. कराड येथील दत्त चौकातील दुकानांमध्येही पाणी शिरले आहे.
सातारा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून सकाळी साडे दहा वाजेपर्यंत ४०. १ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण ३०. ५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |