07:54pm | Aug 02, 2022 |
सातारा : शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघात येऊन गद्दारांवर तुफान हल्ला चढवला. ही गद्दारी केवळ शिवसेनेबरोबर झालेली नाही, ही गद्दारी केवळ उद्धव साहेबांबरोबर झालेली नाही, तर ही माणुसकीसोबत झालेली गद्दारी आहे, असा घणाघात करत, अशा गद्दारीला आपण पाठबळ देणार का असा जळजळीत सवाल आदित्य ठाकरे यांनी करताच उपस्थितांनी 'नाही... नाही' म्हणून प्रतिसाद दिला.
आदित्य ठाकरे यांनी सुरू केलेल्या निष्ठा यात्रेला महाराष्ट्रभर जबरदस्त प्रतिसाद मिळत असून त्यामुळे विरोधकांना धडकी भरत आहे. आज ही निष्ठा यात्रा पाटण मतदारसंघात पोहोचली, तेव्हा मिळालेल्या अलोट प्रतिसादाने सर्वत्र चैतन्य संचारले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी गद्दारांवर हल्लाबोल केला.
ज्या शिवसेनेने यांना ओळख दिली, सत्ता आणि पदे दिली, त्याच शिवसेनेची यांनी गद्दारी केली. शिवसेनेने यांना काय कमी दिले होते ? आपली काय चूक झाली ? यांना लायकीपेक्षा जास्त दिले हीच आपली चूक झाली असे म्हणावे लागेल. मागील चाळीस वर्षात मुख्यमंत्र्यांनी जी खाती अन्य मंत्र्यांना दिली नव्हती ती खातीदेखील त्यांना दिली. ज्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांना सर्व काही दिले त्यांना त्यांची प्रकृती ठीक नसताना, कठीण काळात साथ द्यायचे सोडून यांनी आपल्या कोण गळाला लागते, कोणाला फोडता येईल याचे ठोकताळे बांधत पक्ष फोडायला सुरुवात केली.
हे आपल्याला योग्य वाटते का ? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना केला. तेव्हा, 'गद्दारांचे करायचे काय... खाली मुंडी वर पाय' अशा जोरदार घोषणा घुमल्या.
कोविड काळात उद्धव ठाकरे यांनी कुटुंबप्रमुखाप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेची काळजी घेतली. त्यांच्याशी सुसंवाद ठेवला. प्रचंड प्रमाणात विकास कामे केली. माणसासोबत निसर्गही सांभाळला. जातीय सलोखा उत्तम राहिला. कोठेही जातीय दंगली झाल्या नाहीत. सत्तेत आल्यावर पहिला निर्णय शिवरायांच्या रायगडासाठी ६०० कोटी रुपयांचा निधी देण्याचा घेतला, तर शेवटचा निर्णय संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराचा घेतला. उद्धव साहेब हा माणूस मेन स्ट्रीममध्ये येतोय, त्यांना जनतेच्या हृदयात स्थान मिळतेय हेच या गद्दारांचे मूळ दुखणे असेल अशी घनाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
ठाकरे परिवाराला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्र तोडण्याचे राजकारण सुरू आहे. पण आज मी जेव्हा महाराष्ट्रभर फिरत आहे तेव्हा सर्वत्र मला जे प्रेम मिळत आहे हीच आमची ताकद आहे आणि हेच आमचे कुटुंब आहे, असे उद्गार ठाकरे यांनी काढताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. मी आज तुमच्याकडे प्रेम आणि आशीर्वाद मागायला आलो आहे, असे त्यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे यांच्या मल्हार पेठ दौऱ्याकडे पाटण तालुकासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. रणरणते ऊन आणि असेही उकाड्यातही हजारोंचा जनसमुदाय त्यांचे भाषण ऐकण्यासाठी आतुर झाला होता. निसरे फाट्यापासून मल्हारपेठकडे येत असताना रस्त्याच्या दुतर्फा तुफान गर्दी झाली होती. ही गर्दी नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक होत होती. त्यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत आणि 'कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला', 'शिवसेना झिंदाबाद' अशा घोषणांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सुहासिनींनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर व्यासपीठावर येऊन आदित्य ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर उपस्थितांपुढे नतमस्तक होऊन त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
तत्पूर्वी माजी आमदार दगडूदादा सकपाळ, माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांच्यासह शिवसैनिकांची आवेशपूर्ण भाषणे झाली. यावेळी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल हर्षद कदम यांचा आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भगवी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या मेळाव्यास शिवसेना सचिव ,खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, शिवसेना उपनेते व सातारा - सांगली जिल्हा संपर्कप्रमुख नितीन बानुगडे - पाटील, माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, युवा सेनेचे सातारा जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले, माजी जिल्हाप्रमुख हनुमंत चवरे, महिला आघाडीच्या छायाताई शिंदे, बाळासाहेब शिंदे, भानुदास पोळ यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना, युवा सेना तसेच महिला आघाडीच्या आजी - माजी पदाधिकारी व हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |