04:16pm | Apr 10, 2021 |
सातारा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व दस्त नोंदणीच्या सोयीसाठी विभागात ऑनलाईन सेवा उपलब्ध आहेत. सेवांचा नागरिकांनी वापर करुन दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने सेवा व सुविधांचा वापर करावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी बी.के. खांडेकर यांनी केले आहे.
नागरिकांनी या विभागाच्या संकेतस्थळावर असलेल्या दस्त नोंदणीकरिता पीडीई द्वारे डेटा एंट्री करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापुढे दुय्यम निबंधक कार्यालयातील डेटा एंट्री किंवा दुरुस्त्या पूर्णपणे थांबविण्यात येत आहेत. नागरिकांनी पीडीई डेटा एंट्री करुन दस्त नोंदणीसाठी या विभागाच्या संकेतस्थळावर eStep-in या प्रणालीद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयातील उपलब्ध असलेली सोयीची वेळ ऑनलाईन आगाऊ बुक करुन किंवा कार्यालयीन दूरध्वनी,समक्ष संपर्क साधून वेळ आरिक्षित केली नसल्यास दस्त नोंदणी होणार नाही याची नोंद घ्यावी. नागरिकांनी दस्ताचे निष्पादन घरी किंवा कार्यालयाच्या बाहेर करावे व प्रत्येक व्यक्तीने सह्यांसाठी स्वत:चे पेन आणावे. एकच पेन एकमेकांत वापरु नये, आरक्षित वेळेलाच कार्यालयात हजर रहावे, मास्क लावल्या शिवाय कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी. विभागाच्या संकेतस्थळावर लिव्ह ॲन्ड लायसन्स ई-रजिस्ट्रेशन प्रणालीचा पर्याय उपलब्ध असल्याने लिव्ह ॲन्ड लायसन्स दस्ताची कार्यालयातील नोंदणी (फिजीकल रजिस्ट्रेशन) पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात येत आहे, असेही मुद्रांक जिल्हाधिकारी खांडेकर यांनी कळविले आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |