12:39pm | Dec 25, 2020 |
बुध: 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर 145 ची बेरीज करून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणारे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हेच खरे गणित तज्ज्ञ आहेत, असे मत प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे बीसी-ओबीसी सेलचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
रमेश उबाळे म्हणाले, 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीचीच सत्ता येणार असल्याचे अनेकांची भाकीत होते. दरम्यान भाजप-शिवसेना युतीची सत्ता येण्याची चर्चा होऊ लागली. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेची महाआघाडी निर्माण करून 145 आमदारांची बेरीज करून भारतीय जनता पार्टीला धोबीपछाड देऊन सत्तेपासून दूर ठेवणारे शरद पवार हेच खरे गणित तत्ज्ञ आहेत.
आपण भारतीय जनता पार्टीमध्ये होतो ही आपली चूक असल्याचे कबूल करून रमेश उबाळे यांनी पुढे म्हटले आहे, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराला राष्ट्रवादी काँग्रेस पुढे घेऊन जाणारा एकमेव पक्ष आहे. बहुजन समाजाने या पक्षाच्या पाठीमागे राहिले पाहिजे. अनेक वर्षे भाजपमध्ये काम केलेल्या एकनाथ खडसे यांच्यासारख्या नेत्यावर भाजपमध्ये अन्याय झाल्याने त्यांनीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून शरद पवार यांचे नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीपर्यत अनेक नेते भाजपमधून बाहेर पडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील. असा मला विश्वास वाटत असून आगामी लोकसभा निवडणूकित राष्ट्रवादीचे जास्तीत- जास्त खासदार निवडुन येऊन पवार पंतप्रधान होतील, असेही रमेश उबाळे यांनी म्हटले आहे.
भाजपमध्ये गेली तीन-चार वर्षे मी काम केले परंतू तरीही त्या ठिकाणी आपणास न्याय मिळाला नाही. माजी जलसंपदा मंत्री आ.शशिकांत शिंदेंना भेटताना मनामध्ये धाक-धुक होती. परंतू हा विशाल हृदयाचा नेता आहे. माझे राजकीय कारकीर्द संपुष्टात आले असताना मला राष्ट्रवादीत प्रवेश देऊन पक्षातील प्रदेशपातळीवरचे पद दिले. माझ्यावर केलेले उपकार मी कधीच विसरू शकत नाही. या उपकाराची परतफेड मी नक्की करून दाखवीन असेही उबाळे यांनी पत्रकात म्हटले आहे.
महाविकास आघाडी निर्माण करणारे गणित तज्ज्ञ
शिवसेना-57, राष्ट्रवादी-54, काँग्रेस-44 अशी 155 ची बेरीज करून कधी न निर्माण होणार्या महाविकास आघाडी निर्माण करणार्या गणित तज्ज्ञास अंतर राष्ट्रीय गणित शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! शरद पवार, आ. शशिकांत शिंदे तसेच उबाळे यांचे फोटो आसलेली पोष्ट तयार करून रमेश उबाळे यांनी सोशल मीडियावर टाकलेली पोष्ट सध्या चर्चेत आहे.
ज्यांचेवर नेहमी टीका टिप्पणी केली. त्यांनीच आज उचच पदावर नेऊन ठेवले परंतु ज्यांचेसाठी अहोरात्र कष्ट केले त्यांनी जाणीव ठेवली नाही. उलट मी अडचणीत कसा येईन यासाठी प्रयत्न केले माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला तुमच्याकडून न्याय मिळत नसेल तर इतर कार्यकर्त्यांना तुम्ही काय न्याय देणार? असा टोलाही रमेश उबाळे यांनी आ. महेश शिंदे यांचा नामोल्लेख टाळून पत्रकात लगावला आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |