07:35pm | Oct 29, 2020 |
सातारा : कोडोली, सातारा येथील गट नं. 224/7 या मिळकती संदर्भाने अशोक संभाजी गायकवाड यांच्या तक्रारीवरुन या व्यवहाराच्या अनुषंगाने ऍड. कमलेश पिसाळ, सुनील झंवर, राधेश्याम भंडारी, इंदिरा घार्गे व मिळकतीच्या मूळ मालकांवर दि. 25 रोजी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश सातारचे प्रथम न्यायदंडाधिकाऱयांनी दिली होते. मात्र, त्या आदेशाविरुध्द सत्र न्यायालयात दाखल झालेल्या रिव्हिजन अर्जाच्या सुनावणीत न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश रद्द केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, अशोक संभाजी गायकवाड यांनी या जमीन व्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. मात्र, 224/7 मिळकतीशी तक्रारदार अशोक गायकवाड यांचा काहीही संबंध नव्हता. या मिळकतीचे मूळ मालक बनसोडे यांना व त्यांच्या पूर्वजांना ही मिळकत जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाने इनामी रिग्रँट व सुतार यांना कूळ कायदा कलम 32 ग अन्वये मिळाली होती. 2011 साली बनसोडे व सुतार यांनी कोडोतील सदरची मिळकत महसूल अधिकाऱयांची रीतसर परवानगी घेऊन सुनील झंवर, राधेशाम भंडारी, इंदिरा घार्गे व ऍड. कमलेश पिसाळ यांना खरेदी दिली. त्यात कोणतीही अफरातफर वा फसवणूक करण्यात आली नव्हती. मात्र न्यायालयाचा आदेश आल्यावर त्यावर सोशल मिडियावर उलट सुलट चर्चा झाली होती. ऍड. पिसाळ यांच्यासह चौघांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱयांच्या गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाविरुध्द सत्र न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला होता. त्याची सुनावणी होवून न्यायालयाने न्यायदंडाधिकाऱयांचा गुन्हा दाखल करण्याचा आदर्श रद्द केला आहे. या सुनावणीत ऍड. कमलेश पिसाळ व इतरांतर्फे ऍड. शामप्रसाद बेगमपुरे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय़ धरण्यात आला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |