11:39pm | Jun 23, 2020 |
नवी दिल्ली : देशात आणि जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी करोनावरील लस शोधण्यावर भर देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं कोरोनावरील आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ लाँच केलं आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आयुर्वेदिक औषध प्रभावी आहे, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. मात्र आता पतंजली कंपनीने योग्य तपासणी होईपर्यत कोरोनिल औषधाची जाहिरात न करण्याचे आदेश आयुष मंत्रालयाने दिले आहे.
आयुष मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीने कोरोनावरील उपचारासाठी विकसित केलेल्या कोरोनिल औषधाची आम्ही दखल घेतली आहे. पतंजली कंपनीने या औषधाची योग्य ती माहिती द्यावी, असं आयुष मंत्रालयाने सांगितले आहे. तसेच पतंजलीने क्लिनिकल ट्रायल झाल्याचा दावा केला आहे. मात्र त्याचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत असं आयुष मंत्रालाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोरोनिल औषधाची योग्य ती तपासणी होईपर्यत या औषधामुळे कोरोना आजार बरा होतो, अशा आशयाची जाहिरात न करण्याचे आदेश देखील आयुष मंत्रालयाकडून पतांजलीला देण्यात आले आहे.
योगगुरु बाबा रामदेव आणि पंतजलीचे सीईओ बालकृष्ण यांनी या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलचे निकाल समोर आणले आहे. बालकृष्णांच्या मते, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी लोकांनी योगही केला पाहिजे आणि योग्य आहार घ्यावा.
कोरोनिलमध्ये गिलोय, अश्वगंधा, तुळशी, स्वासारी रस आणि अणु तेलाचे मिश्रण आहे. त्यांच्या मते, हे औषध दिवसातून दोनदा - सकाळी आणि संध्याकाळी घेतले जाऊ शकते असं बाळकृष्ण यांनी सांगितले. पतंजलीच्या मते, या औषधाचा शेकडो रूग्णांवर सकारात्मक क्लिनिकल चाचणी केली आहे. ज्याचा निकाल 100 टक्के आहे. कोरोनिल कोविड -१९ रुग्णांना ५ ते १४ दिवसांत बरे करू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.
Ministry has taken cognizance of news in media about Ayurvedic medicines developed for #COVID19 treatment by Patanjali Ayurved Ltd. The company asked to provide details of medicines & to stop advertising/publicising such claims till the issue is duly examined: Ministry of AYUSH pic.twitter.com/OBpQlWAspu
— ANI (@ANI) June 23, 2020
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |