08:05pm | Jun 28, 2022 |
सातारा : गेले आठवडाभर शिवसेनेचे उपकार व प्रयत्नाने मंत्री, आमदार झालेल्या सातारा जिल्ह्यातील तीन गद्दार बंडखोरांविरोधात मोठा आक्रोश व्यक्त होत आहे. खटाव तालुक्यातील वडूज या ठिकाणी आज दुपारी शिवसेनेचा आक्रमक चेहरा असलेले शिवसेना तालुकाप्रमुख शहाजीराजे गोडसे व कट्टर शिवसैनिक युवराज पाटील, बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संतप्त शिवसैनिकांनी मंत्री एकनाथ शिंदे, शुभराज देसाई, आ. महेश शिंदे यांच्या फोटोला उलटे टांगून लाल मिरच्यांची धुरी दिली.
यावेळी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है... अशी घोषणाबाजी दिली. यावेळी ऐंशी वर्षाच्या सीताबाई पालवे यांनी शिवसेनेचे समर्थन करीत घोषणाबाजी केली.
कोरेगाव -खटावच्या पळपुट्या आमदारांनी भाडोत्री गुंड पाठवून मोर्चे काढले. लायकी नव्हती त्यांना शिवसेनेने आमदार केले. शिवसेना पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना कधीही मराठी माणूस माफ करणार नाही, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते हणमंत घाडगे, शहाजीराजे गोडसे, युवराज पाटील, बाळासाहेब जाधव, महेश गोडसे, सुशांत पार्लेकर, आबासाहेब भोसले, विक्रम गोडसे, संतोष दुबळे, किशोर गोडसे असे प्रमुख शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
त्यांच्या समवेत खटाव तालुक्यातील शिवसैनिक वैभव तोडकर, मंगेश मोहिते, मधुकर मोहिते, आप्पाजी खुडे, अजय देवकर, हणमंत आण्णा देवकर, विशाल चव्हाण, फिरोजभाई मुलाणी, चंद्रकांत साठे तसेच खटाव तालुक्यातील विविध गावांतून शिवसैनिक महिला राणी काळे, दिलशाद सलीम तांबोळी, प्रमिला दुबळे, सीताबाई पालवे, प्रियांका दुबळे, सलमा शेख, संध्या देशमुख, धनश्री इनामदार, गोसावी, कल्पना गुरव, सुनिता साठे, दिपाली माने, सीमा उमापे, कांताबाई देशमुख, बाळूताई उमापे, जयश्री पवार, साधना माने, रेखा कोळी, दिलशाद सलीम तांबोळी, सीताबाई पालवे यांनी या आंदोलनात सहभागी होऊन निषेध नोंदवला. या आंदोलनाला वडूजकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला. तसेच वडूज पोलीस ठाण्याचे सपोनि मालोजीराव देशमुख यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |