08:39pm | Sep 13, 2020 |
सातारा : सातारा जिल्हा पोलिस दलाच्यावतीने पोलिस व खासगी लोकांसाठी सुरु केलेले ऑक्सीजनयुक्त कोव्हीड हॉस्पिटल राज्यात आदर्शवत आहे. कोरोना संक्रमणाचा गेल्या पाच महिन्यात सर्वठिकाणी प्रादुर्भाव वाढला आहे. दुर्देवाने आता ग्रामीण भागात त्याचे प्रमाण लक्षणीय असून त्याची चिंता सतावणारी आहेे. निर्माण झालेल्या या परिस्थितीचा सर्वांनी सामना करुया. पोलिसांसाठी व जिल्ह्यावासीयांसाठी लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही सर्व प्रयत्न करत असून नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
रविवारी सायंकाळी याचा लोकार्पण सोहळा विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आ. जयकुमार गोरे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सिव्हील सर्जन डॉ. सुभाष चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.
या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर, हाय फ्लो ऑक्सिजन, ऑक्सिजन बेड, साधारण बेड, एक्स रे मशिन, ई सी जी मशीन, कार्डीयाक ऍम्ब्युलन्स (24 तास उपलब्ध) इत्यादी सुविधा असणार आहेत. सद्य परिस्थितीमध्ये 35 बेडची क्षमता असून उपलब्ध बेड संख्येपैकी 50 टक्के बेड हे पोलीस अधिकारी/ कर्मचारी यांच्याकरिता राखीव व 50 टक्के नागरिकांकरिता उपलब्ध होणार आहेत. दर पंधरा दिवसांनी बेड उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात येणार असून आढाव्याअंती पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत. सातारा मेडिकल असोसिएशन मधील एकूण 11 डॉक्टर्सचा समूह यांचे व्यवस्थापन पाहणार असून काही पूर्ण वेळ तर काही व्हीसीटिंग फॅकल्टी असणार आहेत.तीन शिफ्टमध्ये काम चालणार आहे.
पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील म्हणाले, एसपी तेजस्वी सातपुते व त्यांच्या सहकार्यांचे हे भरीव काम असून त्याचा सर्वांना फायदा होणार आहेे. आ. जयकुमार गोरे म्हणाले, सातारा पोलिस दलाने अवघड असणारे काम सोप करुन दाखवले आहेे. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते या कार्यक्रमाच्या सर्वोसर्वा आहेत. लोकप्रतिनिधी या नात्याने कोणतीही मदत लागली तर आपणास सांगितली तर ती पूर्ण करु, असे आश्वासन त्यांनी दिले. आयजी मनोजकुमार लोहिया म्हणाले, पोलिस हा समाजाचा कणा आहेे. नागरिकांची सुरक्षा करत असताना पोलिस बंधू कोरोनाने बाधित होत आहे. वाढती संख्या पाहून अवघ्या पाच दिवसात केलेले हे सातारा पोलिसांनी केलेले काम राज्य पोलिस दलात आदर्शवत असल्याचे गौरोद्गर काढले. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले.
प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलिसांचे कोव्हीड हॉस्पिटल उभारण्याचे कारण सांगून ते कसे उभारले, याचा आढावा सांगितला.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |