02:24pm | Apr 14, 2021 |
मेढा : कण्हेर जलाशयातील वेण्णा नदीत पोहण्यासाठी केलेल्या 15 वर्षीय शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. निखिल नामदेव केसकर (रा.केसकरवाडी (ता. जावली) असे मृत्यू झालेल्या शालेय विद्यार्थ्याचे नाव आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, केसरकरवाडी (ता.जावली) येथील निखिल केसकर इयत्ता 9 वीमध्ये आहे. निखिल हा वेण्णा नदीकाठी असणार्या मेरूलिंग विद्या मंदिरात शिक्षण घेत होता. तो आपल्या 7 ते 8 सवंगड्यासह कण्हेर जलाशयातील वेण्णा नदीत पोहण्यासाठी गेला होता.
पोहता येत नसल्याने निखील पाण्याचा छोटा डोह पाहून पोहण्याचा प्रयत्न करीत होता. पाण्याचा अंदाज त्याला न आल्याने आणि गाळात रुतत गेल्याने त्याला बाहेर पडता आले नाही. तो पाण्यातून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करीत होता. परंतु त्याला बाहेर पडता आले नाही. अखेर 15 मिनिटांनी गावातील ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढले व मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात तात्काळ दाखल केले. परंतू उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
निखीलचा मृत्यू झाल्याची बातमी गावात कळल्यावर गावात एकच खळबळ उडाली. संपूर्ण गावावर शोककळा पसरली. आज गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर लाडका एकुलता एक मुलगा गेल्याने निखिलच्या आई- वडिलांनी हंबरडाच फोडला. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान बहिण असा परिवार आहे.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |