जम्मू : लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वैष्णोदेवी मंदिरात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना घडली आहे. दर्शनासाठी झालेल्या गर्दीमुळं अचानक चेंगराचेंगरी होऊन १२ भाविकांचा मृत्यू झाला आहे. यात दोन महिलांचा समावेश आहे. या घटनेत २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना देवस्थानच्या नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
नव्या वर्षाचे स्वागत देवदर्शनानं करण्यासाठी प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी वैष्णो देवी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास तरुण भाविकांच्या दोन समूहात वाद झाला. हा वाद चिघळून हाणामारी सुरू झाली. त्यामुळं घाबरून पळापळ सुरू झाली आणि हा अपघात घडला, अशी माहिती स्थानिक खासदार जुगल किशोर यांनी दिली आहे.
वैष्णोदेवी मंदिरातील घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान निधीतून मृतांच्या नातलगांना प्रत्येकी २ लाख रुपये व जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचीही घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. तसेच, या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. या घटनेबद्दल जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी चर्चा करून संपूर्ण माहिती घेतली आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असं शहा यांनी म्हटलं आहे.
पोलीस महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन व्यक्तींमध्ये झालेल्या वादातून ही दुर्दैवी घटना घडली. पहाटे पावणे तीनच्या सुमारास दोन भाविकांमध्ये काही कारणावरून वाद झाला. हा वाद चिघळला. दोन्ही बाजूंकडून इतरही लोक पुढं आले आणि धक्काबुक्की सुरू झाली. तर, प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी रात्री मोठी गर्दी झाली होती. गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी काही लोकांना बाजूला करण्यात येत होतं. त्यावेळी एका व्यक्तीला धक्का दिल्याच्या कारणावरून वाद सुरू झाला आणि पुढची घटना घडली.
मंदिर परिसरात सुमारे अडीच ते तीन लाख भाविकांची गर्दी झाली होती. येण्या-जाण्यासाठी कुठलीही व्यवस्था नव्हती. वेगळ्या रांगा नव्हत्या. त्यातून गर्दी झाली आणि धक्काबुक्कीमुळं लोक एकमेकांवर पडले. काही लोक पळू लागले. खाली पडलेले त्यांच्या पायाखाली चिरडले गेले आणि १२ जणांचा मृत्यू झाला.
दोन वर्षांनंतर झाली होती मोठी गर्दी
दरवर्षी वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. करोनाच्या संकटामुळं मागील दोन वर्षात अनेकांना दर्शनाला जाता आले नव्हते. यंदा करोनाचे निर्बंध शिथिल झालेले असल्यानं व मंदिरंही खुली झाली असल्यानं अनेक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यामुळं यंदा कधी नव्हे इतकी गर्दी झाली होती. त्यातूनच गोंधळ उडाला, असं एका भाविकानं सांगितलं.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |