12:29pm | Apr 26, 2021 |
मुंबई: देशात सध्या कोरोना संकटाने थैमान घातले आहे. या संकटकाळातही आयपीएल स्पर्धा सुरू असली तरी अनेक खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार घेण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाचा धसका घेतल्याने ऑस्टे्रलियाच्या अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांनी आयपीएल सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन आयपीएलमध्ये कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमधून खेळत होते. बंगळुरुने ट्वीट करत हे दोन खेळाडू स्पर्धेत खेळणार नसल्याची माहिती दिली आहे. ‘अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन दोघेही वैयक्तिक कारणांसाठी ऑस्ट्रेलियात परतले आहेत. यापुढच्या सामन्यात ते खेळणार नाहीत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु त्यांच्या निर्णयाचा सन्मान करते. त्यांना संपूर्ण मदतही करत आहे’, असं ट्वीट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने केलं आहे.
अँड्र्यु टाय मायदेशी गेल्यानं राजस्थान रॉयल्सच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याच्या जाण्यानं राजस्थान संघात आता चार परदेशी खेळाडू उरले आहेत. त्यात जोस बटलर, ख्रिस मॉरिस, डेविड मिलर आणि मुस्तफिजुर रहमान यांचा समावेश आहे.
या स्पर्धेपूर्वी दिल्लीचा अक्षर पटेल, कोलकाताचा नितीश राणा आणि बंगळुरुचा देवदत्त पडिक्कल याला करोनाची लागण झाली होती. त्यांनी करोनावर यशस्वीरित्या मात केल्यानंतर संघात पुनरागमन केलं आहे. त्याचबरोबर वानखेडे मैदानातील 10 कर्मचारी आणि बीसीसीआयने स्पर्धेसाठी नेमणूक केलेल्या 6 सदस्यांनाही करोनाची लागण झाली होती. त्यामुळे देशातील करोना स्थिती पाहता खेळाडूंच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |