ज्यांचा शब्द झेलावा, ज्यांचा शब्द प्रमाण मानावा, ज्यांच्या हाकेला ओ द्यावी अशी फार कमी माणसं आपल्याभोवती असतात की ज्यांच्याकडे पाहून आपणही काहीतरी करायला हवं असं सतत वाटू लागतं. डॉ. शिवाजीराव चव्हाण हे त्यामधीलच एक व्यक्तिमत्त्व.
नवं काहीतरी करण्याची प्रचंड ऊर्मी आणि सळसळता उत्साह या व्यक्तिमत्त्वात कायम पहायला मिळायचा. त्यांच्या भाषणातील अचूक आणि मर्मभेदी संदर्भ ऐकत रहावे असेच असायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास शब्दशः त्यांचा तोंडपाठ. सुप्रसिद्ध वक्ते म्हणून जशी त्यांची ख्याती अगदी तशीच सातारच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ओळख. आज सरांच्या अनपेक्षित एक्झिटमुळे माझ्यासह माझ्या अनेक पत्रकार मित्रांना धक्का बसला.
शिवाजीराव चव्हाण सरांचे चिरंजीव केशवराव चव्हाण हे पत्रकार असल्यामुळे बहुदा सर्वच पत्रकारांचे सरांशी चांगले संबध होते. मी तरुण भारत मध्ये असताना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासंबधीचा लेख देण्यासाठी ते अॉफिसला आले होते. त्यावेळी ते रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक होते. यादरम्यान त्यांच्याशी जी काही पंधरावीस मिनिटे चर्चा झाली, तेवढ्या चर्चेवरून त्यांच्याशी माझा वैचारिक स्नेह जूळला. किंबहुना या भेटीमुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे एकूणच जीवनकार्य आणि रयतच्या माध्यमातून कर्मवीर अण्णांनी महाराष्ट्रात घडवून आणलेली शैक्षणिक क्रांती समजून घेण्यासाठीचा एका अर्थाने माझ्यातला उत्साह दुणावला. त्यानंतर अधूनमधून विविध कार्यक्रमात, वर्तमानपत्राच्या स्टॉलवर, ग्रंथमहोत्सवात सरांची भेट व्हायची. त्यावेळी इतिहासातील नवं शोधण्याचा आणि नव्याने ते मांडण्याचा मी कसा प्रयत्न करतोय यावर सर बोलत असत. मागच्या काही महिन्यापूर्वी त्यांची कलेक्टर अॉफिसच्या जवळील मॉडर्न कॉम्यूटर मध्ये त्यांची भेट झाली. तेव्हा ते भरभरून बोलले. अर्थात सेवा निवृत्तीनंतरही ते शांत बसत नव्हते. काहीतरी लिहित वा बोलत असत. गांधी मैदानात एक भव्यदिव्य कार्यक्रम भरला होता. तिथे सरांनी खरे छत्रपती शिवाजी महाराज सांगितले. त्यावेळी अनेकजणांनी कूरबूर केली, मात्र त्यावेळी छत्रापतिंच्या इतिहासाचा विपर्यास कोणत्याही परिस्थितीत होता कामा नये यावर सर ठाम राहिले. खरंतर सरांचा असा वेवैचारिक बेडरपणा माझ्यासारख्या अनेक तरुण पत्रकारांना क्षणभरासाठी का होईना वेगळी ऊर्जा देऊन जात असत. विशेष म्हणजे वयाच्या पासष्टीत त्यांनी केलेली पीएचडी ही तर अनेकांना आश्चर्याचा धक्का देऊन गेली होती.
साता-यापासून दहा पंधरा किलोमीटर अंतरावर विसावलेलंभाटमरळी हे सरांचे मूळ गांव. याच गावातून त्यांनी कष्ट करण्यास सुरुवात केली. पुढे जिद्दीच्या बळावर कष्ट आणि परिश्रम करून त्यांनी स्वतःचं आयुष्यं फुलवलं. स्वतःचं आयुष्य फुलवता, फुलवता मुलांच्याही जगण्याचं आणि जीवानाचं सोनं केलं. एक मुलगा पत्रकार, दुसरे सयाजीराव बांधकाम व्यवसायात प्रसिद्ध, तर तिसरे जयदीपराव वैद्यकीय क्षेत्रात अगदी कमी कालावधीत डॉक्टर म्हणून नावारुपाला आलेले. आज तिन्हीही मुले आपआपल्याला परिने स्वतःचं वेगळेपण टिकूवून आहेत. अर्थात याचे कारण सरांचे संस्कार ! सरांशी वा त्यांचे पत्रकार असणारे चिरंजीव केशवराव यांच्याशी जेव्हा केव्हा चर्चा व्हायची तेव्हा सरांनी जीवनात कष्टाला किती महत्त्व दिले हे लक्षात आल्यावाचून रहायचे नाही. शिवाय कर्मवीर भाऊराव पाटील यांचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर किती खोलवर झाला आहे हेही निदर्शनास येऊन जायचे. कदाचित त्यामुळेच कष्ट करून शिकणं, झगडणं आणि जगणं याचा एक आदर्श त्यांच्या एकूण जीवन प्रवासातून आपल्या गवसून जातो !
काही वर्षापूर्वी सरांच्या भाटमरळी या मूळ गावी 'पाटीलवाडा' या भव्यदिव्य हॉटेलची उभारणी त्यांनी केली. या पाटीलवाड्याच्या उदघाटन सोहळ्याची सुत्रे माझ्यावर सोपवली. खरं म्हणजे सरांच्या बद्दल भरभरून बोलण्याची संधीच या सोहळ्याने मला उपलब्ध करून दिली. आ. शिवेंद्रराजे भोसले आणि वेदांतिकाराजे भोसले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शिवाय जिल्ह्याच्या वैद्यकीय, बांधकाम, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता अशा क्षेत्रातील असंख्य बूजूर्ग हजर होते. स्टेजवरील माईक माझ्या हातात होता. काय बोलायचे यासंबंधी आधीच केशवरावांशी चर्चा झाली होती. स्टेजच्यासमोर पत्रकार शरद काटकर यांच्यासह अन्य पत्रकार व रोटरीचे काही पदाधिकारी पहिल्याच रांगेत स्थानापन्न झाले होते. यथावकाश उदघाटन झाले आणि मग सरांच्याबद्दल मी बोलता झालो. अर्थात सर्वांच्याच टाळ्या झाल्या. केशवरावांनी हातानेच खुणावलं, एक नंबर ! कार्यक्रम समारोपाकडे निघाला तोच सरांनी मला जवळ बोलावले आणि फार सुंदर बोललात असं म्हणत पाठीवर थाप टाकली. जवळच असणा-या आ. शिवेंद्रराजेंनीही माझ्याकडे कटाक्ष टाकला आणि सरांच्या समोरच म्हणाले, तुम्ही एवढे चांगले बोललात आता आम्ही बोलायची गरजच नाही वगैरे वगैरे..!
साता-यात जेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकले त्या प्रतापसिह महाराज हायस्कूल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन वर्षोनुवर्षे मी साजरा करत आलोय हे सर्व सातारकरांना ठाऊक आहेच. हा शाळा प्रवेश दिन महाराष्ट्र शासनाने 'विद्यार्थी दिवस' म्हणून घोषित केल्यानंतर शिवाजीराव चव्हाण यांनी जिल्हापरिषदेत माझं कोतुकही केले होते. भाऊराव आणि बाबासाहेब यांच्यातील नातं कसं होतं हेही त्यांनी स्पष्ट केले होते. कर्मवीर भाऊराव पाटलांना भारतरत्न मिळावा अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली व्यक्त केली होती.
हे सारं लिहिण्याचं तात्पर्य असं स्वतःच्या अस्तित्वानं इतरांना ऊर्जा देणारं आणि ऊनपाऊस वादळवारा याची कसलीही तमा न बाळगता सतत उत्साहानं तळपाणारं व्यक्तिमत्त्व अनपेक्षितपणे आपल्यातून निघून जाणं हे निश्चितच धक्कादायक होय. साता-याला जे काही आजवर तारे लाभले त्यातील सरांच्या रुपाने एक सुसंस्कृत तारा आज निखळला असेच म्हणावे लागेल. सरांना भावपूर्ण श्रध्दांजली !
अरुण विश्वंभर जावळे.
९८२२४१५४७२
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |