01:28pm | Sep 25, 2020 |
हुनाई: व्हिएतनाममधील सरकारी वृत्तवाहिनी व्हीटीवीने दिलेल्या एका वृत्तानंतर खळबळ उडाली आहे. आजपर्यंत झेरॉक्स मशीन, कॉम्प्युटर, प्रिंटर अशा वस्तू नूतनीकरण (रिफरर्बिश्ड) करून बाजारात विकल्या जात असल्याचे सर्वश्रूत आहे. यामुळे कमी पैशात वस्तू खरेदी करून काम सुरू करता येते होते. परंतु काही महाभाग असेही आहेत की ज्यांनी चक्क कंडोमच पुन्हा वापरण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा कारनामा केला आहे. व्हिएतनाममध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका ठिकाणी सुमारे तीन लाख 24 हजार कंडोम जप्त करण्यात आले आहेत. स्वत:च्या फायद्यासाठी दुसर्याचा जीव धोक्यात घालणार्या या महाभागांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत व्हिएतनाममध्ये उघडकीस आलेल्या धक्कादायक प्रकाराबाबत अधिक महिती अशी की, व्हिएतनाममधील सरकारी वृत्तवाहिनी व्हीटीवीने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण प्रातांतील बिन्ह दुओंगमधील एका गोदामात वापरेले कंडोम असलेले जवळपास 12 गोणी आढळल्या. या गोण्यांचे वजन जवळपास 360 किलो होते. पोलिसांनी त्यांच्याकडून एका गोदामात ठेवलेले सुमारे तीन लाख 24 हजार वापरलेले कंडोम जप्त केले आहेत.
या गोदामाच्या मालकाने सांगितले की, आरोपींना एका अज्ञात व्यक्तींकडून त्यांना दर महिन्याला वापरेल्या कंडोमची बॅग मिळत होती. पोलिसांनी या छाप्यात एका महिलेलाही ताब्यात घेतले आहे. या महिलेने सांगितले की, वापरलेले कंडोम उकळत्या पाण्यात टाकले जायचे. त्यानंतर त्यांना सुकवले जायचे. महिलेने सांगितले की, या सुकवलेल्या कंडोमला लाकडी लिंगाच्या आधारे पुन्हा आकार दिला जात होता. त्यानंतर कंडोमची पॅकेजिंग करून त्यांची विक्री केली जात होती. आतापर्यंत या कंडोमची किती विक्री झाली, याबाबत नेमकी माहिती समोर आली नसल्याचे वृत्तात म्हटले आहे. या महिलेला कंडोमच्या वजनाप्रमाणे कामाचे पैसे मिळत होते.
कंडोमच्या वापरानंतर त्याची तात्काळ विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. कंडोमला एक वैद्यकीय वस्तू समजले जाते आणि गोदामाच्या मालकाने आणखी किती कायद्याचे उल्लंघन केले याचीही माहिती घेत असल्याचे एका सरकारी अधिकार्यांनी सांगितले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |